अरमान कोहलीवर पुन्हा अटकेची टागंती तलवार?, एक्स गर्लफ्रेंडला पैसे परत केले नाही तर खावी लागणार तुरुंगाची हवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 14:17 IST2023-07-13T14:15:03+5:302023-07-13T14:17:11+5:30
ड्रग्जपासून ते गर्लफ्रेंडला मारहाण करण्यापर्यंत अरमानवर अनेक खटले कोर्टात सुरू आहेत.

अरमान कोहलीवर पुन्हा अटकेची टागंती तलवार?, एक्स गर्लफ्रेंडला पैसे परत केले नाही तर खावी लागणार तुरुंगाची हवा
बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉस फेम अरमान कोहली हा त्याच्या अभिनयापेक्षा वादांमुळे जास्त चर्चेत असतो. ड्रग्जपासून ते गर्लफ्रेंडला मारहाण करण्यापर्यंत अरमानवर अनेक खटले कोर्टात सुरू आहेत. एक्स गर्लफ्रेंडला मारहाण केल्याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने अरमान कोहलीला दोन पर्याय दिले आहेत. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, एकतर एक्स गर्लफ्रेंडला पैसे दे नाहीतर तुरुंगात जा. जाणून घ्या काय आहे प्रकरण आणि कोर्टाने अभिनेत्याला काय फटकारले आहे.
काय आहे प्रकरण?
हे प्रकरण 2018 सालचे आहे जेव्हा अरमान कोहलीची एक्स गर्लफ्रेंड नीरू रंधावाने त्याच्यावर खटला दाखल केला होता. आता मुंबई उच्च न्यायालयाने अरमान कोहलीला दोन पर्याय दिले आहेत. अरमानने नीरू रंधावाला ५० लाख रुपये देऊन तोडगा काढावा अन्यथा तुरुंगात शिक्षा भोगण्यास तयार राहावे.
सध्या या प्रकरणी अभिनेत्याची कोणतीच प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, कोर्टाने अभिनेत्याच्या वकिलाला त्याचा पर्याय स्पष्ट करण्यासाठी १८ जुलैपर्यंतचा वेळ दिला आहे.
नीरू रंधावाने २०१८ मध्ये अरमान कोहलीविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी अरमानलाही कलम ३२३, ५०४ आणि ५०६ अंतर्गत अटक करण्यात आली होती. तक्रारीत नीरूने सांगितले होते की, ती आणि अरमान तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघे मुंबईतील सांताक्रूझ फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते. अभिनेत्याने तिला मारहाण केल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अरमान कोहलीला त्यावेळी लोणावळ्यातून अटक केली होती. त्यावेळी कोर्टाने अरमान कोहलीला असे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते की तो असे पुन्हा करणार नाही आणि नीरूला 50 लाख रुपये देईल. पण अभिनेत्याने तसे केले नाही. आता पुन्हा नीरूने न्यायालयात धाव घेतली आहे.