आर्म्स अॅक्ट प्रकरण : सलमान खान जोधपूर न्यायालयात हजर; पुढची सुनावणी ३ आॅक्टोंबर रोजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 12:02 PM2017-08-04T12:02:34+5:302017-08-04T17:32:48+5:30
१८ वर्षांपूर्वी अवैद्यरीत्या शस्त्रास्त्रे बाळगणे अन् त्याचा शिकारीसाठी वापर केल्याप्रकरणी सलमान खानला जोधपूर न्यायालयात आज हजर करण्यात आले. यावेळी ...
१८ वर्षांपूर्वी अवैद्यरीत्या शस्त्रास्त्रे बाळगणे अन् त्याचा शिकारीसाठी वापर केल्याप्रकरणी सलमान खानला जोधपूर न्यायालयात आज हजर करण्यात आले. यावेळी सलमानने न्यायालयात वैयक्तिक २० हजार रुपयांचा जात मुचलका सादर केल्यानंतर काही वेळातच त्याची सुटका करण्यात आली. आता या प्रकरणी पुढील सुनावणी ५ आॅक्टोबर रोजी होणार आहे. काही दिवसांपूर्वीच जोधपूर न्यायालयाने सलमानला मोठा दिलासा देत त्याची याप्रकरणातून निर्दोष मुक्तता केली होती. परंतु राज्य सरकारने सेशन कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत सलमानला निर्दोष करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर सलमानला एक नोटीस देत त्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. गेल्या महिन्यातच त्याला न्यायालयात हजर होणे अपेक्षित होते, परंतु न्यायाधीशांच्या बदल्यांमुळे तारीख एक महिना पुढे ढकलण्यात आली होती.
१८ वर्षं जुन्या असलेल्या या प्रकरणात आतापर्यंत २० साक्षीदार तपासण्यात आले आहेत. सलमानवर आरोप आहे की, १९९८ मध्ये त्याने ‘हम साथ-साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळी काळविटाची शिकार केली होती. शिकारीसाठी वापरण्यात आलेले शस्त्र हे विना परवाना असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. सलमानवर हरीण शिकारीचे एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. यापैकी काळवीट आणि हरीण शिकारीच्या दोन प्रकरणात स्थानिक न्यायालयांनी त्याला शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. तत्पूर्वी स्थानिक न्यायालयाच्या निकालामुळे त्याची काही काळ कारागृहातही रवानगी करण्यात आली होती. पुढे उच्च न्यायालयात सबळ पुरावे नसल्या कारणाने त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
Rajasthan: Salman Khan leaves after appearing in Jodhpur Sessions Court in connection with illegal arms act case; further hearing on 5 Oct. pic.twitter.com/Wx5ZtRfAEG— ANI (@ANI) August 4, 2017
Rajasthan: Actor Salman Khan appears in Jodhpur Sessions Court in connection with illegal arms act case. pic.twitter.com/HOXijM5afG— ANI (@ANI) August 4, 2017
मात्र न्यायालयाच्या या निर्णयाला राज्य सरकारने आव्हान दिल्याने त्याला पुन्हा एकदा हे प्रकरण लढावे लागत आहे. याप्रकरणावेळी सलमानसोबत सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम हेदेखील होते. चिंकारा आणि काळवीट शिकार प्रकरणात सलमानला उपसविण्याचा सैफसह तिन्ही अॅक्ट्रेसवर आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी सलमानला स्थानिक न्यायालयांनी १ वर्ष आणि पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयात जेव्हा सलमानने अपील केले होती, तेव्हा याच वर्षाच्या जानेवारी महिन्यात पुराव्यांअभावी त्याची निर्दोष मुक्तता केली होती.
दरम्यान, सलमानचे वकील हस्तिमल सारस्वत यांनी म्हटले की, न्यायालयात व्यक्तिगत हजर राहण्याची काही आवश्यकता नव्हती. कारण न्यायालयात कुठल्याही प्रकारचा युक्तिवाद होणार नव्हता. केवळ जात मुचलक्याची रक्कम जमा करायची होती. न्यायालयानेच याबाबतचा आदेश दिला होता, असेही अॅड. हस्तिमल सारस्वत यांनी सांगितले.