एकीकडे सलमान खानला धमक्या, तिकडे अर्पिता खानने विकला बांद्रामधला कोटींचा फ्लॅट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 10:56 AM2024-10-20T10:56:18+5:302024-10-20T10:56:49+5:30

हा कोटींचा फ्लॅट अर्पिताने का विकला असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

Arpita Khan sells bandra flat for crores amidst threats to Salman Khan | एकीकडे सलमान खानला धमक्या, तिकडे अर्पिता खानने विकला बांद्रामधला कोटींचा फ्लॅट

एकीकडे सलमान खानला धमक्या, तिकडे अर्पिता खानने विकला बांद्रामधला कोटींचा फ्लॅट

दबंग अभिनेता सलमान खानला मिळणाऱ्या धमक्यांमुळे बॉलिवूड हादरलं आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमानला खुलेआम धमक्या मिळत आहेत. खान कुटुंब आणि सलमानचे जवळचे सर्वच चिंतेत आहेत. दरम्यान सलमानची लाडकी बहीण अर्पिता खानने (Arpita Khan) तिचा बांद्रा येथील आलिशान फ्लॅट विकला आहे. हा कोटींचा फ्लॅट अर्पिताने का विकला असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. याचा सलमानला मिळणाऱ्या धमक्यांशी काही कनेक्शन संबंध आहे का अशीही चर्चा आहे.

झैपकी रिपोर्टनुसार, ४ फेब्रुवारी २०२२ मध्ये आयुष शर्मा आणि अर्पिता खानने बांद्रा येथील आलिशान फ्लॅट खरेदी केला होता. त्याची किंमत तब्बल १० कोटी रुपये होती. या फ्लॅटसाठी ४० लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली होती.  खार पश्चिम येथील सतगुरु डेव्हलपर्सच्या फ्लाइंग कार्पेटच्या उंच इमारतीत १२ व्या मजल्यावर हा फ्लॅट होता. १७५० स्क्वेअर फूट इतका त्याचा एरिया आहे. ज्यामध्ये चार पार्किंग स्पेस आहेत. आता दोन वर्षांनंतर आयुष आणि अर्पिताने १० कोटींचा हा फ्लॅट तब्बल २२ कोटींना विकला आहे. याचाच अर्थ त्यांना यामध्ये १२ कोटींचा नफा झाला आहे.  आता हा फ्लॅट कोणी खरेदी केला याची माहिती समोर आलेली नाही.


दरम्यान अर्पिता आणि आयुषने बांद्राचा फ्लॅट विकून आता वरळीमध्ये नवीन फ्लॅट घेतला आहे. याची किंमतही कोटींच्या घरात आहे. याबद्दल त्यांच्याकडून अधिकृत माहिती आलेली नाही.

अर्पिता आणि आयुष २०१४ मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सध्या सलमान खानला मिळणाऱ्या धमक्यांमुळे अर्पिताही चिंतेत आहे. त्यातच ही फ्लॅट्सची डील केल्याने काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Web Title: Arpita Khan sells bandra flat for crores amidst threats to Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.