केआरकेविरोधात अटक वॉरंट जारी, मनोज वाजपेयीने दाखल केलेल्या केसवर कारवाई; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 12:29 PM2023-03-18T12:29:18+5:302023-03-18T12:31:32+5:30

अभिनेता मनोज वाजपेयीने दाखल केलेल्या केसनंतर केआरकेवर ही कारवाई करण्यात आली आहे.

Arrest warrant issued against KRK action taken on case filed by Manoj bajpayee | केआरकेविरोधात अटक वॉरंट जारी, मनोज वाजपेयीने दाखल केलेल्या केसवर कारवाई; नेमकं प्रकरण काय?

केआरकेविरोधात अटक वॉरंट जारी, मनोज वाजपेयीने दाखल केलेल्या केसवर कारवाई; नेमकं प्रकरण काय?

googlenewsNext

वादग्रस्त वक्तव्यांवरुन नेहमी चर्चेत असलेला अभिनेता केआरकेविरोधात (KRK) अरेस्ट वॉरंट जारी झाला आहे. अभिनेता मनोज वाजपेयीने (Manoj Bajpayee)  दाखल केलेल्या केसनंतर केआरकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. केआरकेने मनोज वाजपेयीला त्याच्या 'द फॅमिली मॅन' (The Family Man) या वेबसिरीजवरुन लक्ष केले होते. याआधीही केआरकेविरोधात कोर्टात हजर न राहिल्याप्रकरणी जामीनपात्र अटकवॉरंट जारी झाले होते, मात्र आता त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

इंदुर जिल्हा न्यायालयाने फिल्म प्रोड्युसर आणि अभिनेता कमाल राशिद खान विरोधात हे अटक वॉरंट जारी केले आहे. २०२१ मध्ये मनोज वाजपेयीने केआरकेविरोधात केस दाखल केली होती. या केसच्या सुनावणीला हजर न राहिल्याबद्दल कोर्टाने अटक वॉरंट जारी केले. मनोज वाजपेयीच्या वकिलांकडून दाखल अर्जात नमूद करण्यात आले की, 'केआरकेला त्याच्याविरोधात असलेल्या केसची माहिती आहे तरी तो कोर्टात मुद्दामून हजर राहत नाही.' तर दुसरीकडे केआरकेच्या वकिलांकडून स्पष्टीकरण देताना सांगण्यात आले की, 'प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे त्यामुळे कारवाईवर स्थगिती देण्यात यावी.' आता या प्रकरणावर पुढील सुनावणी १० मे रोजी होणार आहे.

'भारतात महिला आळशी' या सोनालीच्या वक्तव्यावर उर्फीची नाराजी; म्हणाली, 'पुरुष महिलांना फक्त...'

नेमकं प्रकरण काय?

मनोज वाजपेयीने केआरकेविरोधात मानहानीची केस दाखल केली होती. १३ डिसेंबर २०२२ रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने कमाल खानच्या याचिका धुडकावली. त्याने स्वत:वर असलेल्या मानहानीविरोधातील केसला आव्हान दिले होते. केआरकेने मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन'ची स्टोरी ऐकली ज्यामध्ये मनोज वाजपेयीच्या पत्नी आणि मुलीचे बॉयफ्रेंड असतात. यावर ट्वीट करत त्याने, सिरीजला नावं ठेवत नशेडी, गंजेडी असे म्हणले होते. केआरकेच्या याच ट्वीटवरुन मनोज वाजपेयीने तक्रार दाखल केली होती.

Web Title: Arrest warrant issued against KRK action taken on case filed by Manoj bajpayee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.