'लोल - हँसे तो फसे' सीरिजचे सूत्रसंचालन करणार अर्शद वारसी आणि बोमण ईराणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 08:59 PM2021-04-21T20:59:47+5:302021-04-21T21:00:16+5:30
'लोल हँसे तो फसे'चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला.
अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने नुकतीच अॅमेझॉनची ओरिजनल सीरिज लोल हँसे तो फसेचा ट्रेलर रिलीज केला आहे. या सीरिजमध्ये विनोदवीरांचा ग्रुप दिसणार आहे. जे आपल्या विनोदी कौशल्याने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडणार आहेत. या शोचे अर्शद वारसी आणि बोमण ईराणी सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत. या शोमध्ये आदार मलिक, आकाश गुप्ता, अदिती मित्तल, अंकिता श्रीवास्तव, साइरस ब्रोचा, गौरव गेरा, कुशा कपिला, मल्लिका दुआ, सुनील ग्रोव्हर आणि सुरेश मेनन कठीण आव्हानांना सामोरे जाताना दिसणार आहे.
कदाचित पहिल्यांदाच या विनोदवीरांच्या फक्त विनोद बुद्धीचीच नाही तर त्यांच्या सहनशक्तीची परीक्षा घेतली जाणार आहे. कारण त्यांना तब्बल सलग सहा तासांपर्यंत लढायचे आहे. जिथे ते स्वतः पोकर चेहरा बनवून घरातील उपस्थित हसविताना दिसणार आहेत. त्या घरात शेवटपर्यंत हसवत रहायचे आहे. मात्र त्यांनी स्वतः हसायचे नाही आहे. जो शेवटपर्यंत असे करू शकेल तो शोमध्ये विजेता ठरेल. हा शो ३० एप्रिलला अॅमेझॉन प्राइमवर पहायला मिळणार आहे.
सुनील ग्रोव्हर म्हणाला की, मी घरामध्ये प्रवेश करून माझ्यासोबत या रणांगणामध्ये कोण असणार आहे हे पाहताच माझ्या मनात विचार आला फसलो.'लोल - हँसे तो फसे' हा वेगळाच आणि चॅलेंजिंग अनुभव होता. हा फक्त शो नसून अनोखा मानवी प्रयोग आहे. एकाच छताखाली एका स्पर्धेसाठी १० विनोदी व्यावसायिक कॉमेडियन्स एकत्र येतील हा विचारच करू शकत नाही. तसेच तुम्ही हसूदेखील शकत नाही. मी फक्त एवढेच सांगू शकतो की ते सोपे नव्हते, पण खूप धमाल केली आणि प्रेक्षकही धमाल करतील, अशी आशा आहे.