एकेकाळी पत्नीच्या पैशावर जगत होता 'हा' अभिनेता; आज आहे कोटयवधींचा मालक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 15:21 IST2023-04-19T15:21:15+5:302023-04-19T15:21:59+5:30
Bollywood actor: बॉलिवूडमध्ये हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याने मोठे अडथळे पार करत ही प्रसिद्ध मिळवली आहे.

एकेकाळी पत्नीच्या पैशावर जगत होता 'हा' अभिनेता; आज आहे कोटयवधींचा मालक
कलाविश्वात आज अनेक दिग्गज कलाकारांची रेलचेल पाहायला मिळते. त्यामुळे या कलाकारांच्या लक्झरी लाइफस्टाइल, महागड्या वस्तू यांची कायमच नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते. परंतु, ही आलिशान लाइफ जगण्यापूर्वी अनेक कलाकारांनी मोठा स्ट्रगल केला आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे अर्शद वारसी(arshad warsi). बॉलिवूडमध्ये हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याने मोठे अडथळे पार करत ही प्रसिद्ध मिळवली आहे. त्यामुळे आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या स्ट्रगलविषयी जाणून घेऊयात.
'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमात सर्किट ही भूमिका साकारुन अर्शद वारसीने तुफान लोकप्रियता मिळवली. या सिनेमानंतर जणू त्याचं जीवन बदलून गेलं. मात्र, या सिनेमापूर्वी तो बेरोजगार होता. इतंकच काय तर त्याच्या या हालाखीच्या दिवसात त्याच्या पत्नीने त्याला पुरेपूर साथ दिली.
अर्शदचा पहिला सिनेमा 'तेरे मेरे सपने' हा अपयशी ठरला. त्यानंतर जवळपास तीन वर्ष तो बेरोजगार होता. त्याला कोणीही सिनेमात काम देत नव्हतं. मात्र, या काळातही त्याने प्रयत्न करायचे सोडले नाहीत.
पत्नीने दिली साथ
अर्शदकडे काम नसताना त्याच्या पत्नीने त्याला बरीच साथ दिली. एका मुलाखतीत त्याने पत्नी मारिया गोरेटी हिने दिलेल्या साथीविषयी भाष्य केलं होतं. 'ते दिवस माझ्यासाठी खूपच खडतर होते. त्यावेळी मारिया नोकरी करत होती. तिच्या पगारावरच घरखर्च चालत होता,' असं अर्शद म्हणाला.
दरम्यान, तीन वर्ष संघर्ष केल्यानंतर अर्शदला हळूहळू काम मिळू लागलं. २००३ मध्ये त्याला मुन्नाभाई एमबीबीएस सिनेमाची ऑफर मिळाली आणि त्याने हा सिनेमा साइन केला. या सिनेमानंतर त्याने गोलमाल सीरिज, धमाल, जॉलीएलएलबी, इश्किया आणि डेढ इश्किया, बच्चन पांडे या सिनेमात काम केलं.