भारीच! अभिनेता अर्शद वारसी करणार टीव्हीवर कमबॅक; या शोमध्ये दिसणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 13:37 IST2023-10-05T13:35:42+5:302023-10-05T13:37:43+5:30
अभिनेता अर्शद वारसी टीव्हीवर कमबॅक करणार आहे.

Arshad Warsi
सध्या सुरू असलेल्या अनेक मालिकांवर नजर टाकली, तर बरेच मोठे कलाकार टीव्हीवर कमबॅक करताना दिसताहेत. टीव्ही माध्यमाची ताकद मोठी असल्यानं प्रेक्षकांशी पुन्हा कनेक्ट होण्यासाठी या माध्यमाकडे वळल्याचं हे कलाकार म्हणतात. आता अभिनेता अर्शद वारसी टीव्हीवर कमबॅक करणार आहे. रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा' च्या 11 व्या सीझनमध्ये तो जज म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अर्शद वारसी सहा वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक करणार आहे. 'झलक दिखला जा' च्या 11 व्या सीझनसाठी जज म्हणून फराह खान आणि मलायका अरोरा यांची नावे निश्चित करण्यात आली. तर तिसऱ्या जजच्या नावाचा शोध सुरू होता. तो अर्शद वारसीपर्यंत येऊन थांबला.
अर्शद वारसीने 'सबसे फेव्हरेट कौन', 'बिग बॉस 1' आणि 'राजमाताज'सह अनेक शो होस्ट केले आहेत. याशिवाय त्याने 'जरा नचके देखा' या डान्स रिअॅलिटी शोला जज केले होते. अर्शद वारसी 'इशान: सपनो को आवाज दो' आणि 'करिश्मा: द मिरॅकल्स ऑफ डेस्टिनी'मध्येही अभिनय करताना दिसला होता.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता अर्शद वारसी सध्या त्याच्या 'असुर 2' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. अर्शद वारसी, अनुप्रिया गोएंका, रिद्धी डोगरा आणि वरुण सोबती यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १ जून रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला. या मालिकेत अर्शद वारसी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली असून अर्शद वारसीच्या भूमिकेचेही खूप कौतुक झाले आहे.