अभिनयाव्यक्तरिक्त 'या' गोष्टी करण्यात रमतात हे कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2017 10:36 AM2017-06-29T10:36:02+5:302017-06-30T12:27:27+5:30
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांच्यामध्ये अभिनय आणि नृत्य या कलागुणा व्यक्तिरिक्त अनेक कलागुणांनी परिपूर्ण असतात. ...
ब लिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांच्यामध्ये अभिनय आणि नृत्य या कलागुणा व्यक्तिरिक्त अनेक कलागुणांनी परिपूर्ण असतात. यातले काही जण खेळामध्ये माहिर आहेत. यातला काही कलाकरांनी बॉलिवूडमध्ये पदार्पणानंतरही आपले खेळातील प्रशिक्षण सुरु ठेवले तर काहींनी बिझी शेड्युलमुळे ते अर्धवट सोडून दिले. आशाच काही बॉलिवूडच्या स्टारर्सवर नजर टाकूया जे झाले अभिनय क्षेत्रात नसते तर नक्कीच स्पोर्टसपर्सन (स्पोर्टसमॅन) झाले असते.
दीपिका पादुकोण
बॉलिवू़डची मस्तानी अर्थात दीपिका पादुकोण ही प्रसिद्ध बॅडमिंनट पटू प्रकाश पादुकोण यांची मुलगी आहे दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन पटू आहेत. दीपिका स्वत: उत्कृष्ट बॅडमिंटनपटू आहे. बॅडमिंटनचे प्राथमिक धडे तिला वडिलांनाकडूनच मिळाले. शाळेत असल्यापासून दीपिका राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळायची. मात्र मॉडेलिंग क्षेत्राकडे वळल्यानंतर दीपिकाने बॅडमिंटन खेळणे थांबवले.
टायगर श्रॉफ
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की टायगरची पहिली पसंती अॅक्टिंग नसून नेहमीच स्पोर्ट्स आणि फिटनेसकडे होती. त्याचे मार्शल आर्टवर असेलेले प्रेम त्याच्या आतापर्यंतच्या सर्व चित्रपटात दिसून आले आहे. यावरून एक स्पष्ट होते टायगर जर अभिनेता झाला नसता तर तो नक्कीच एक चांगला मार्शल आर्टस् मास्टर झाला असता.
रणदीप हुड्डा
रणदीप हुड्डाने एक कलाकार म्हणून आपले प्रोफाईल नेहमीच लो ठेवले आहे. एक गोष्ट रणदीपबद्दलची खूप कमी लोकांना माहिती आहे तो जेवढा चांगला अभिनेता आहे तेवढेच त्याचे घोडेस्वारीवर देखील प्रेम आहे . वयाच्या 9 व्या वर्षापासून तो घोडेस्वारी करतो. घोडेस्वारीचा खेळ त्याला रोमांचकारी वाटतो. तो प्रोफेशनली घोडेस्वारी करायचा तसेच तो नियमितपणे पोलो मॅचेसमध्ये ही सहभाग घ्यायचा. त्यांने या खेळात अनेक मेडल्सदेखील मिळवली आहेत.
तापसी पन्नू
तापसी पन्नू जर अभिनेत्री झाली नसती तर नक्कीच ती एक चांगली स्कॉश प्लेअर झाली असती. ती हा खेळ्यात अत्यंत परांगत आहे गेल्या काही वर्षांपासून ती हा खेळ खेळत आहे. ती आपल्या फिटनेससाठीच क्रेडीट स्कॉश या खेळाला देते. तिच्या शेजारच्या मुलांना ज्यांना या खेळाबद्दल आवड आहे त्यांना ती स्कॉशचे धडे देत असते.
रणबीर कपूर
बॉलिवूडमधील हंड सम हंक रणबीर कपूरचे फुटबॉल प्रेम तर जगजाहीर आहे. रणबीर खूप चांगला फुटबॉल पटू आहे. अनेक वेळा त्याला बांद्रातील मैदानावर अभिषेक बच्चनसोबत खेळताना दिसला झाला आहे. अनेक चॅरिटी मॅचसाठी तो मैदानात उतरतो. फुटबॉल खेळताना एक वेगळाच आनंद त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच दिसत असतो.
जॉन अब्राहम
रणबीर प्रमाणे जॉन अब्राहम ही फुटबॉलचा दिवाना आहे. जॉनचे लहानपणापासून स्वप्न होते की त्याला फुटबॉलच्या वर्ल्डकप टीममध्ये सहभागी व्हायचे होते. शाळे आणि कॉलेजमध्ये असताना जॉन त्याच्या फुटबॉल टीमचा कर्णधार होता.