Lakshmi Ganesh on Currency Note : नोटांवर लक्ष्मी, गणेश छापा म्हणणाऱ्या केजरीवालांना प्रकाश राज यांचा टोमणा, विशाल ददलानीही संतापला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 05:41 PM2022-10-27T17:41:06+5:302022-10-27T17:44:57+5:30
Arvind Kejriwal, Laxmi Ganesh on Currency Notes: नोटेच्या दुसऱ्या बाजूला गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापावा, अशी मागणी केजरीवाल यांनी केलीय. या मुद्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. चित्रपटसृष्टीतील मंडळींनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Arvind Kejriwal, Laxmi Ganesh on Currency Notes: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी बुधवारी एक विधान केलं आणि या त्यांच्या या विधानानं नव्या वादाला तोंड फुटलं. नोटेच्या दुसऱ्या बाजूला गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापावा, अशी मागणी केजरीवाल यांनी मोदी सरकारकडे केलीय. गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल हिंदुत्ववादी कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांच्यावर भाजपकडून करण्यात आलाय आणि या मुद्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. चित्रपटसृष्टीतील मंडळींनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. साऊथ सुपरस्टार प्रकाश राज (Prakash Raj), बॉलिवूड कंपोझर विशाल ददलानी ( Vishal Dadlani ), अभिनेत्री गुल पनाग (Gul Panag) ही नाव प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये आघाडीवर आहेत.
प्रकाश राज यांनी केजरीवालांवर साधला निशाणा
And when rupee fails .. we can say ..it’s an act of god #justaskinghttps://t.co/I7GGBFSDJH
— Prakash Raj (@prakashraaj) October 26, 2022
सिंघम, वॉन्टेड यासारख्या बॉलिवूड सिनेमात झळकलेले साऊथ सुपरस्टार प्रकाश राज यांनी एक ट्विट करत केजरीवालांवर निशाणा साधला आहे. त्यांनी केजरीवालांच्या नोटांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. यात अरविंद केजरीवाल दिसत आहेत. त्यांच्या एका हातात एक पुस्तक आहे आणि त्यावर लक्ष्मीचा फोटो आहे. हे व्यंगचित्र शेअर करत, प्रकाश राज यांनी केजरीवालांना लक्ष्य केलं आहे. ‘- आणि जेव्हा रूपया पडतो, तेव्हा आपण सर्व म्हणतो की ही सगळी परमेश्वराची माया आहे...,’ असं त्यांनी लिहिलं आहे.
अशा माणसासोबत माझा काहीही संबंध नाही...
The Constitution of India states that we are a Secular Socialist Republic.
— VISHAL DADLANI (@VishalDadlani) October 26, 2022
Hence, religion must have NO PLACE in governance.
To be completely clear, I have nothing to do with anyone who brings any part of any religion to any aspect of government.
Jai Hind. 🙏🏽
विशाल ददलानी यानेही केजरीवालांवर टीका केली आहे. आत्तापर्यंत विशाल ददलानी केजरीवालांच्या आम आदमी पार्टीचा समर्थक राहिला आहे. पण केजरीवालांच्या ताज्या विधानानंतर विशाल ददलानीनं रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. ‘भारतीय राज्यघटना सांगते की आपण धर्मनिरपेक्ष समाजवादी प्रजासत्ताक आहोत. त्यामुळे राज्यकारभारात धर्माला स्थान नसावं. स्पष्टपणे सांगायचं तर, जो कोणत्याही धर्माला सरकारी कारभारात आणतो अशा कोणाशीही माझा काहीही संबंध नाही,’ असं विशाल ददलानीनं केजरीवालांचं नाव न घेता लिहिलं आहे.
याचा काहीही फायदा व्हायचा नाही...
Whether it’s a means to an end or an end in itself - bringing religion into everything, is a game everyone will play now. And not just politicians!
Those who disagree can keep invoking the Constitution, in vain. #currencynotes— Gul Panag (@GulPanag) October 27, 2022
अभिनेत्री गुल पनाग हिने पंजाबात आम आदमी पार्टीचा प्रचार केला होता. पण केजरीवालांच्या नोटांबाबातच्या विधानाने गुल पनागही संतापली आहे. तिने एक ट्विट करत, केजरीवालांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘प्रत्येक गोष्टीत धर्म आणणे हा एक खेळ आहे, जो आता केवळ राजकारणीच नाहीत तर प्रत्येकजण खेळताना दिसेल. पण यामुळे काहीही फायदा होणार नाही...,’ अशा आशयाचं ट्विट तिने केलं आहे.
काय म्हणाले केजरीवाल?
केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझी विनंती आहे की, त्यांनी भारतीय चलनावर एका बाजूने महात्मा गांधी आणि दुसºया बाजूला लक्ष्मी तसेच गणेशाची प्रतिमा छापावी. सर्वच नोटा बदलाव्यात असं आम्ही म्हणत नाही. पण ज्या नोटा छापल्या जाणार आहेत, त्यावर लक्ष्मी आणि गणेशाची प्रतिमा असावी, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
इंडोनेशिया हा एक मुस्लिम देश आहे. तिथे 85 टक्के मुस्लिम आहेत. तर दोन टक्के हिंदू आहेत. तरीही त्यांनी त्यांच्या नोटांवर गणेशाचा फोटो छापला आहे. प्रत्येक कुटुंब श्रीमंत व्हावं असं आम्हाला वाटतं. त्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे. चांगल्या शाळा, रुग्णालये आणि मूलभूत सुविधा दिल्या पाहिजे. देवदेवतांचा आशीर्वाद असेल तेव्हाच हे प्रत्यक्षात उतरेल, असंही त्यांनी सांगितलं. परवा दिवाळीच्या वेळी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करताना हा विचार मनात आला. लक्ष्मी आणि गणेशाचा फोटो छापल्याने अर्थव्यवस्था सुधारेल असं मी म्हणत नाही. पण देवांचे आशीर्वाद मिळतील. आम्ही नोटांवरून काही हटवावं असं म्हणत नाहीये. फक्त इंडोनेशिया करतं तर आपण का करू शकत नाही, इतकंच आमचं म्हणणं आहे. लक्ष्मी ही समृद्धी आणि संपन्नतेची देवी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.