Aryan Khan Drug Case: शाहरुख खानच्या 'मन्नत'मध्ये होणार NCBचं सर्च ऑपरेशन!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 03:38 PM2021-10-04T15:38:05+5:302021-10-04T15:39:32+5:30
अटक करण्यात आलेले सर्वच्या सर्व आठही आरोपी वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जहाजावर पोहोचले होते. मात्र, त्यांचे इतर सहकारी, जे ड्रग्सचे सेवन करत होते, ते रेडची माहिती मिळताच घटनास्थळावरून फरार झाले. याप्रकरणी, सध्या छापेमारी सुरू आहे आणि आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
मुंबई - दिल्लीमध्ये एनसीबीची बेधडक छापेमारी सुरू आहे. याचबरोबर, मुंबईत अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या घरीही सर्च ऑपरेशन सुरू आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक झाल्यानंतर एनडीपीएस कायद्यात प्रत्येक आरोपीच्या घरी हाऊस सर्चची तरतुदही आहे. यामुळे, सुपरस्टार शाहरुख खानच्या मुंबई येथील मन्नतमध्येही एनसीबीचे सर्च ऑपरेशन होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Aryan Khan drugs party case; Will there be NCB search operation at Shahrukh Khan house Mannat)
अटक करण्यात आलेले सर्वच्या सर्व आठही आरोपी वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जहाजावर पोहोचले होते. मात्र, त्यांचे इतर सहकारी, जे ड्रग्सचे सेवन करत होते, ते रेडची माहिती मिळताच घटनास्थळावरून फरार झाले. याप्रकरणी, सध्या छापेमारी सुरू आहे आणि आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
आर्यनने घेतलं एनसीबीच्या मेसचं जेवण -
शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा सर्वात जवळचा मित्र अरबाज मर्चंट ड्रग्स कुठून आणायचा, याची माहिती NCB ला मिळाली आहे. NCBने आतापर्यंत 8 जणांना क्रूझवरून ताब्यात घेतले आहे. आर्यनने रविवारी केवळ एनसीबीच्या मेसमधीलच जेवण घेतले. त्याला बाहेरचे अन्न दिले गेले नाही.
वरिष्ठ वकील सतीश माने-शिंदे हे आर्यन खानची बाजू मांडणार आहेत. ते एनसीबीने केलेल्या आरोपांविरोधात आर्यन खानचा बचाव करतील. सतीश मानशिंदे बॉलिवूडच्या टॉप सेलिब्रेटींचे वकील राहिले आहेत. यापूर्वी त्यांनी, रिया चक्रवर्ती, सलमान खान आणि संजय दत्त यांची बाजूही न्यायालयात मांडली आहे.