Mumbai rave party case: '...तर आर्यन दोषी नाही'; सुशांत सिंह राजपूतच्या वकिलांचा आर्यनला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 02:16 PM2021-10-08T14:16:20+5:302021-10-08T14:16:53+5:30

Mumbai cruise drug case: या प्रकरणात किंग खानच्या मुलाचं नाव आल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. अनेकांनी आर्यनला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी त्याला ट्रोलही केलं आहे.

aryan khan gets support from sushant singh rajput lawyer vikas singh in drugs case | Mumbai rave party case: '...तर आर्यन दोषी नाही'; सुशांत सिंह राजपूतच्या वकिलांचा आर्यनला पाठिंबा

Mumbai rave party case: '...तर आर्यन दोषी नाही'; सुशांत सिंह राजपूतच्या वकिलांचा आर्यनला पाठिंबा

googlenewsNext
ठळक मुद्दे २ ऑक्टोबर रोजी एनसीबीने मुंबईतील एका क्रुझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा डाव उधळून लावला होता.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खान ड्रग्स पार्टी प्रकरणी एनसीबीच्या ताब्यात आहे. २ ऑक्टोबर रोजी एनसीबीने (NCB)  मुंबईतील एका क्रुझवर (mumbai cruise drug case) छापा टाकला होता. यावेळी क्रुझवर हायक्लास ड्रग्स पार्टी सुरु असल्याचं समोर आलं. या पार्टीमध्ये आर्यन खानसह (aryan khan) दिल्लीतील अनेक नामांकित उद्योगपतींच्या मुलांचा सहभाग आहे. ड्रग्स पार्टीचा डाव उधळून लावल्यानंतर एनसीबीने आर्यनसह अन्य ८ जणांना ताब्यात घेतलं आहे. सध्या हे आठही जण एनसीबीच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात किंग खानच्या मुलाचं नाव आल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. अनेकांनी आर्यनला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी त्याला ट्रोलही केलं आहे. यामध्येच दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा खटला लढवणाऱ्या वकिलांनी आर्यनला पाठिंबा दिला आहे. एका मुलाखतीत ते बोलत होते.

ड्रग्स प्रकरणी आर्यनला अटक झाल्यानंतर सुशांत सिंह राजपूतच्या वकिलांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'जर आर्यनकडे कोणत्याही प्रकारचं ड्रग्स आढळलं नाही तर तो दोषी सिद्ध होत नाही. आणि हेच कायदा सांगतो ', असं ते म्हणाले आहेत.

Mumbai rave party case: 'लाजिरवाणा राजकीय डाव'; रविना टंडनची सोशल मीडियावर आगपाखड

विकास सिंग यांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचा खटला लढवला होता. सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन हा मुद्दा समोर आला होता. त्यावेळी विकास सिंग चर्चेत आले होते. त्यानंतर आता आर्यन प्रकरणात वक्तव्य केल्यामुळे ते पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. 

दरम्यान,  २ ऑक्टोबर रोजी एनसीबीने मुंबईतील एका क्रुझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा डाव उधळून लावला होता. त्यानंतर या प्रकरणात आर्यन खानला ताब्यात घेतलं आहे. यावेळी आर्यनसह अन्य ८ जणांच्या कस्टडीमध्ये ११ ऑक्टोबरपर्यंत वाढ मिळावी अशी मागणी एनसीबीने केली होती. 
 

Web Title: aryan khan gets support from sushant singh rajput lawyer vikas singh in drugs case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.