४ वर्षांपासून आर्यन खान घेतोय ड्रग्स, NCBच्या चौकशीत केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 12:34 PM2021-10-04T12:34:25+5:302021-10-04T12:35:25+5:30

अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने शनिवारी रात्री क्रुझमधील रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली आहे.

Aryan Khan has been taking drugs for 4 years, NCB's investigation revealed | ४ वर्षांपासून आर्यन खान घेतोय ड्रग्स, NCBच्या चौकशीत केला खुलासा

४ वर्षांपासून आर्यन खान घेतोय ड्रग्स, NCBच्या चौकशीत केला खुलासा

googlenewsNext

अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री मुंबईहून गोव्यात जाणाऱ्या क्रुझमधील रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे.

आर्यन खानची ड्रग्स प्रकरणात चौकशी केली जात आहे. या चौकशीदरम्यान आर्यन खानला रडू कोसळले. या दरम्यान आर्यनने जवळपास ४ वर्षांपासून ड्रग्सचे सेवन करत असल्याचे सांगितले. आर्यन सोबत इतर दोघांना एका दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली. शाहरुखच्या मुलाने कालची रात्र एनसीबी कोठडीत घालवली. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांची रात्र एनसीबी कोठडीत घालवली.


आर्यन खानच्या चौकशीदरम्यान समोर आले की आर्यनने फक्त भारतातच नाही भारताबाहेर युके, दुबई आणि इतर देशातही ड्रग्सचे सेवन केले आहे. आर्यनसोबत अटक झालेल्या अरबाज मर्चंटला तो जवळपास १५ वर्षांपासून ओळखतो आणि ते दोघे जुने मित्र आहेत.


आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते एनसीबीने केलेल्या आरोपांविरोधात आर्यन खानचा बचाव करणार आहेत. सतीश मानशिंदे बॉलिवूडच्या टॉप सेलिब्रेटींचे वकील राहिले आहेत.


आज तकच्या रिपोर्ट्सनुसार, मुंबई एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी या प्रकरणाबद्दल सांगितले की, आम्ही या प्रकरणी एकूण ८ लोकांना अटक केली आहे. हे सर्व क्रुझवर ड्रग्स सेवन आणि सप्लायसाठी आले होते. अटक केलेल्या ८ लोकांपैकी ३ आरोपींना कोर्टात सादर केले आहे. इतर ५ जणांना नंतर कोर्टात सादर करण्यात येणार आहे. एनसीबीची कारवाई अद्याप सुरू आहे. काही ठिकाणांवर झडती होते आहे.

Web Title: Aryan Khan has been taking drugs for 4 years, NCB's investigation revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.