Halloween party : हॅलोवीन पार्टी अन् आर्यन खानचा अॅटिट्यूड, पाहा स्टारकिड्सचे खास व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 13:01 IST2022-10-30T12:59:36+5:302022-10-30T13:01:16+5:30
Bollywood Halloween party : सारा अली खानपासून जान्हवी कपूर, अनन्या पांडे, नव्या नवेली असे सगळे स्टारकिड्स हॅलोवीन पार्टीत दिसले. पण सर्वाधिक चर्चा झाली ती शाहरूख खानचा ‘लाडला’ आर्यन खान याची.

Halloween party : हॅलोवीन पार्टी अन् आर्यन खानचा अॅटिट्यूड, पाहा स्टारकिड्सचे खास व्हिडीओ
Aryan Khan, Janhvi Kapoor, Sara Ali Khan attend Halloween party : बॉलिवूडमध्ये सध्या पार्ट्यांना ऊत आला आहे. दिवाळी पार्ट्यांची धूम होती. आता हॅलोवीन पार्ट्यांची चर्चा होताना दिसतेय. काल रात्री ओरहान अवात्रामणिने हॅलोवीन पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक स्टारकिड्सनी हजेरी लावली. सारा अली खानपासूनजान्हवी कपूर, अनन्या पांडे, नव्या नवेली असे सगळे स्टारकिड्स या पार्टीत दिसले. पण सर्वाधिक चर्चा झाली ती शाहरूख खानचा ‘लाडला’ आर्यन खान याची.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने या पार्टीचे व्हिडीओ शेअर केले आहेत. या पार्टीला आर्यन खान ऑल ब्लॅक पार्टी लुकमध्ये दिसला. त्याने काळ्या रंगांचे कपडे परिधान केले होते. त्यावर चंदेरी जॅकेट शिवाय डोळ्यांचा विशिष्ट मेकअप अशा लुकमध्ये आर्यनने पार्टीत हजेरी लावली. यावेळी त्याच्याभोवती बॉडीगार्डचा गराडा दिसला.
सारा अली खान ब्लॅक लेदरचा मिनी स्कर्ट आणि सिल्वर डीप नेक टॉपमध्ये दिसली. यावेळी तिच्या हेअरस्टाईनने लक्ष वेधून घेतलं.
अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चनची मुलगी नव्या नवेली हिनेही पार्टीला हजेरी लावली. यावेळी ती अलादीनची राजकुमारी जॅस्मिनच्या लुकमध्ये दिसली.
अनन्या पार्टीने हॅलोवीनसोबत बर्थ डेही साजरा केला. पार्टीत ती लाईट पिंक क्रॉप टॉप व मिनी स्कर्टमध्ये दिसली.
जान्हवी कपूर ऑल ब्लॅक लुकमध्ये दिसली. यावेळी तिचा मेकअप खास होता. तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी पार्टीत गर्लफ्रेन्ड तानिया श्रॉफसोबत दिसला.