आशा भोसलेंना संजू राठोडच्या 'गुलाबी साडी'ची भुरळ, गायिकेने गायलेलं गाणं तुम्ही ऐकलं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:26 IST2025-01-02T16:25:11+5:302025-01-02T16:26:27+5:30
एका कॉन्सर्टमध्ये आशा भोसलेंनी संजू राठोडचं 'गुलाबी साडी' हे गाणं गायलं.

आशा भोसलेंना संजू राठोडच्या 'गुलाबी साडी'ची भुरळ, गायिकेने गायलेलं गाणं तुम्ही ऐकलं का?
"गुलाबी साडी आणि लाली लाल लाल..." हे गाणं इतकं लोकप्रिय झालंय की काही केल्या गाण्याची क्रेझ कमी होत नाहीये. संजू राठोडने गायलेलं हे गाणं लग्न, पार्टी आणि कार्यक्रमात आवर्जुन लावलं जातं. एवढंच काय, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यातही हे गाणं वाजलं होतं. अंबानीच्या वेडिंगमध्ये खुद्द संजू राठोडनेच 'गुलाबी साडी' हे गाणं गायलं होतं. आता सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनाही 'गुलाबी साडी'ची भुरळ पडली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या एका कॉन्सर्टमध्ये आशा भोसलेंनी संजू राठोडचं 'गुलाबी साडी' हे गाणं गायलं. यावेळी त्यांचा अंदाज पाहण्यासारखा होता. गुलाबी साडी नेसून 'गुलाबी साडी' गाणं गाणाऱ्या आशा भोसलेंनी या गाण्यावर ठेका धरल्याचंही पाहायला मिळालं. ९१ व्या वर्षी आशा भोसलेंची ही एनर्जी पाहून सगळेच थक्क झाले. एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आशा भोसलेंचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
याच कॉन्सर्टमध्ये आशा भोसले यांनी विकी कौशलच्या तौबा तौबा गाण्यावर डान्स केला होता. त्यांचा तो व्हिडिओदेखील प्रचंड व्हायरल झाला होता. आता त्यांच्या गुलाबी साडी गाण्यावरील या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.