​मॅडम तुसादमध्ये उभा राहणार आशा भोसलेंचा मेणाचा पुतळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2017 09:49 AM2017-06-14T09:49:20+5:302017-06-14T15:19:20+5:30

गत सहा दशकांपासून भारतीय श्रोत्यांना आपल्या सुरेल आवाजाने  मंत्रमुग्ध करणाºया सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले आता जगप्रसिद्ध मॅडम तुसाद संग्रहालयात ...

Asha Bhosale's wax statue standing in Madam Tussaud! | ​मॅडम तुसादमध्ये उभा राहणार आशा भोसलेंचा मेणाचा पुतळा!

​मॅडम तुसादमध्ये उभा राहणार आशा भोसलेंचा मेणाचा पुतळा!

googlenewsNext
सहा दशकांपासून भारतीय श्रोत्यांना आपल्या सुरेल आवाजाने  मंत्रमुग्ध करणाºया सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले आता जगप्रसिद्ध मॅडम तुसाद संग्रहालयात विराजमान होणार आहेत. होय, सुप्रसिद्ध लोकांच्या मेणाच्या पुतळ्यांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या मॅडम तुसादच्या दिल्लीतील संग्रहालयात  ८३ वर्षीय आशा भोसले यांचा मेणाचा पुतळा बसवण्यात येणार आहे. या संग्रहालयात मेणाचा पुतळा उभारण्यात येणा-या त्या पहिल्या भारतीय गायिका ठरणार आहेत. लंडनच्या धर्तीवर दिल्लीत आकार घेत असलेल्या मॅडम तुसाद संग्रहालयात आशा भोसले यांचा मेणाचा पुतळा बनविण्याची प्रक्रिया जोरात सुरु आहे. स्वत: आशा भोसले यामुळे प्रचंड उत्सुक आहेत.  अलीकडे या संग्रहालयाच्या टीमने मुंबईत येत आशा भोसलेंचे मेजरमेंट व काही फोटो घेतलेत.





मॅडम तुसादमध्ये माझा मेणाचा पुतळा उभारणे माझ्यासाठी मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. हा माझ्यासाठी आनंददायक अनुभव आहे. मी माझा मेणाचा पुतळा पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे, असे आशा भोसले यांनी सांगितले.
लंडनच्या जगप्रसिद्ध मॅडम तुसाद संग्रहालयात आत्तापर्यंत सलमान खानपासून शाहरूख खान, अमिताभ बच्चन, कॅटरिना यांचे मेणाचे पुतळे आहेत. पण दिल्लीत मॅडम तुसाद संग्रहालय उभे राहतेय आणि तिथे आशा भोसलेंचा मेणाचा पुतळा बनणार आहे, ही तमाम भारतीयांसाठी आनंदाचीच नव्हे तर गौरवाची बाब आहे. दिल्लीतील या संग्रहालयाची देखभाल मलर्नि इंटरटेनमेंट ठेवणार आहे. या संग्रहालयात भारतातील खेळ, राजकारण, संगीत, इतिहास, संशोधन, आदी क्षेत्रातील 50 दिग्गजांचे पुतळे उभारण्यात येणार आहे.

 

Web Title: Asha Bhosale's wax statue standing in Madam Tussaud!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.