गायिका आशा भोसले आहेत यशस्वी व्यावसायिका; तुम्हाला माहितीये का त्यांच्या व्यावसायाविषयी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 14:30 IST2023-09-08T14:29:57+5:302023-09-08T14:30:50+5:30
Asha Bhosle: आपल्या आवाजामुळे प्रसिद्ध असलेल्या आशा भोसले त्यांच्या व्यवसायमुळेही विदेशात प्रसिद्ध आहेत.

गायिका आशा भोसले आहेत यशस्वी व्यावसायिका; तुम्हाला माहितीये का त्यांच्या व्यावसायाविषयी?
आपल्या आवाजाने कानसेनांना तृप्त करणाऱ्या लोकप्रिय गायिका म्हणजे आशा भोसले. आजवर त्यांनी वेगवेगळ्या ढंगातील, अंदाजातील गाणी सादर करुन श्रोत्यांची मनं जिंकली. म्हणूनच, आज कलाविश्वात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. विशेष म्हणजे आशा भोसले (asha bhosale) केवळ गायिकाच नसून त्या प्रसिद्ध व्यवसायिकादेखील आहेत.
आपल्या आवाजामुळे देशासह विदेशातही प्रसिद्ध असलेल्या आशा भोसले त्यांच्या व्यवसायमुळेही विदेशात प्रसिद्ध आहेत. आशा भोसले यांचं दुबईत एक आलिशान रेस्टॉरंट आहे. विशेष म्हणजे आशा भोसले यांना वेळ मिळेल तशा त्या या रेस्टॉरंटला भेट देत असतात. इतकंच नाही तर त्या या रेस्टॉरंटमध्ये बऱ्याचदा भारतीय पदार्थ तयार करुन ते ग्राहकांना प्रेमाने जेवू घालतात.
आशा भोसले यांचं दुबईमध्ये एक रेस्टॉरंट आहे हे फार कमी जणांना माहित आहे. काही काळापूर्वी त्यांनी या रेस्टॉरंटमधील एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामुळे त्यांच्या रेस्टॉरंटची माहिती चाहत्यांना मिळाली. विशेष म्हणजे केवळ दुबईच नव्हे तर भारतातही त्यांचे रेस्टॉरंट आहेत. आशा भोसले यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्या त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये स्वयंपाक करताना दिसून येत आहेत. 'Asha's Restaurants' असं त्यांच्या रेस्टॉरंटचं नाव असून जवळपास २० वर्षांपूर्वी त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
दरम्यान, दुबईमधील WAFI मॉलमध्ये त्यांचं हे रेस्टॉरंट असून अशा अनेक ठिकाणी त्यांनी हे रेस्टॉरंट सुरु केलं आहे. विदेशाप्रमाणेच देशातही काही ठिकाणी आशा भोसले यांचं हे रेस्टॉरंट पाहायला मिळतं. आशा भोसले यांनी दुबईमध्ये त्यांचं पहिलं आऊटलेट सुरु केलं होतं. आशा भोसले सोशल मीडियावर सक्रीय असून कायम त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतात.