बॉलिवूडमधील या सहा दिग्गज गायकांनी गायले ऐ जिंदगी हे गाणे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 10:41 AM2018-10-02T10:41:02+5:302018-10-02T10:46:17+5:30
आशा भोसले, सुरेश वाडकर, अलका याज्ञिक, अभिजीत भट्टाचार्य, शान आणि सोनू निगम यासारख्या सहा प्रसिद्ध गायकांच्या आवाजात श्रोत्यांना ऐ जिंदगी हे गाणे ऐकायला मिळणार आहे.
सोनु निगम, आशा भोसले, सुरेश वाडकर, अभिजित भट्टाचार्य, शान या बहु-कलाकरांच्या सहयोगाने आयटीडब्ल्यू प्लेवॅर्क्स म्युझिकने ऐ जिंदगी हे गाणे नुकतेच सादर केले. संगीतकार विशाल मिश्रा यांनी संगीत दिलेले ऐ जिंदगी हे गाणे सहा उत्तम गायकांनी आपपल्या शैलीत गायले असून श्रोत्यांसाठी ही एक पर्वणीच असणार आहे. कारण आशा भोसले, सुरेश वाडकर, अलका याज्ञिक, अभिजीत भट्टाचार्य, शान आणि सोनू निगम यासारख्या सहा प्रसिद्ध गायकांच्या आवाजात श्रोत्यांना हे गाणे ऐकायला मिळणार आहे.
या गाण्याविषयी सोनू निगम सांगतो, "मी बऱ्याच काळापासून संगीत क्षेत्रात आहे. पण क्वचितच “ऐ जिंदगी” सारखं गाणे तयार होते. आयटीडब्ल्यू प्लेवॅर्क्स म्युझिकमधील आम्ही सर्वांनी हे गाणे तयार करण्याचा निर्णय घेतला. सहा कलाकारांनी आपआपल्या शैलीत हे गाणे गायले आहे. आशा भोसले, सुरेश वाडकर, अलका याज्ञिक, अभिजीत भट्टाचार्य, शान यांनी सगळ्यांनीच हे गाणे खूप चांगल्या प्रकारे गायले आहे. याविषयी सुरेश वाडकर सांगतात, "बऱ्याच वर्षानंतर मी खरोखरच विशाल मिश्रा यांनी लिहिलेले “ऐ जिंदगी” एक अत्यंत सुरेख गीत गायले आहे. या सुंदर गाण्यासाठी सोनू निगम आणि विशाल यांचे मनापासून आभार आणि शुभेच्छा.
अलका याज्ञिक सांगते, "हे गाणे माझ्या हृदयाशी खूप जवळ आहे. कारण या गाण्याचे बोल खूप छान असून प्रत्येकाने हे गाणे खूप छान प्रकारे गायले आहे."
अभिजीत भट्टाचार्य सांगतो, "हे गाणे आम्ही सहा जणांनी मिळून गायले आहे. हेच खरे हेल्दी कॉम्पिटिशन आहे असे मी म्हणेन. सर्वोत्कृष्ट गायकांची या गाण्यासाठी निवड करण्यात आली आहे."
शान सांगतो, "हे गाणे अनेक प्रकारे वेगळ्या प्रकारचे आहे. त्यांच्या अनोख्या शैलीत एकाच गाण्याच्या भावनांचा अर्थ सांगण्यासाठी सहा वेगवेगळ्या आवाजांचा वापर करण्यात आला आहे. अशाप्रकारे एकच गाणे इतक्या साऱ्या गायकाने गाणे हे क्वचितच घडते. मला या गाण्याचा भाग व्हायची संधी मिळाली, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो."