​आशा भोसलेंचे ८४ व्या वर्षात पदार्पण, जाणून घ्या माहित नसेलेल्या २० रंजक गोष्टी !!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2016 09:00 AM2016-09-08T09:00:23+5:302016-09-08T14:30:23+5:30

संगीत क्षेत्रात जगभरात नावाजेलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे आशा भोसले, हे नाव सर्वांनाच परिचित असून शास्त्रीय आणि पाश्चिमात्य शैलीचे गाणे गाणाऱ्या  ...

Asha Bhosle's debut in the 84th year, know about 20 interesting things !!! | ​आशा भोसलेंचे ८४ व्या वर्षात पदार्पण, जाणून घ्या माहित नसेलेल्या २० रंजक गोष्टी !!!

​आशा भोसलेंचे ८४ व्या वर्षात पदार्पण, जाणून घ्या माहित नसेलेल्या २० रंजक गोष्टी !!!

googlenewsNext
n style="color:#800080;">संगीत क्षेत्रात जगभरात नावाजेलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे आशा भोसले, हे नाव सर्वांनाच परिचित असून शास्त्रीय आणि पाश्चिमात्य शैलीचे गाणे गाणाऱ्या  ‘मेलोडी क्वीन’चा आज वाढदिवस आहे. ८ सप्टेंबर १९३३ रोजी आशा भोसलेंचा जन्म सांगली येथे झाला. त्यांनी वयाची ८३ वर्षे पूर्ण केली असून ८४ व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात आशाताईंशी संबंधित २० रंजक गोष्टी...

१) आशा भोसले यांनी वयाच्या १० व्या वर्षी म्हणजेच १९४३ मध्ये ‘माझा बाळ’ या चित्रपटात दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘चला चला नव बाळा...’या गाण्याने चित्रपट गायनाला प्रारंभ केला होता. 
२) वयाच्या १६ व्या वर्षी १९४९ मध्ये ‘रात की रानी’ या चित्रपटात पहिले सोलो गाणे गायिले होते. 
३) आशा भोसले यांनी वयाच्या १६ व्या वर्षी गणपतराव भोसले यांच्याशी विवाह केला होता. त्यावेळी गणपतराव आशातार्इंपेक्षा १५ वर्षांनी मोठे होते. लग्नाच्या काही वर्षांनंतर दोन मुलांसह आशातार्इं आपल्या माहेरी परत आली, त्यावेळी आशाताई गरोदर होत्या. 
४) त्यानंतर आशातार्इंनी गायनात सातत्य ठेवले आणि मोहमंद रफींसोबत गायलेल्या ‘ नन्हे मुन्हे बच्चे...’ या गाण्यामुळे आशातार्इंना खूपच प्रसिद्धी मिळाली.
५) आशा भोसलेंना सुप्रसिद्ध गायक रफी, आर.डी.बर्मन, सचीन देव बर्मन आदींसोबत गायनाची संधी मिळाल्याने प्रसिद्धीच्या झोतात आल्या. 
६) १९६० आणि १९७० मध्ये आशातार्इंनी बॉलिवूडमधील अभिनेत्रींसाठी आवाज बनल्या आणि डान्सदेखील उत्तम करायच्या.
७) आशा भोसले यांनी १९८० साली आर.डी.बर्मन यांच्याशी विवाह केला. मात्र लग्नाच्या १४ व्या वर्षानंतर १९९४ मध्ये बर्मन यांचे निधन झाले. 
८) आशा भोसले यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी २०१३ साली ‘माई’या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण केले होते. 
९)आशातार्इंनी आतापर्यंत गायलेल्या गाण्यांची दखल घेत २०११ साली ‘गिनीज बुक आॅफ द वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद करण्यात आली आहे.
१०) भारत सरकारतर्फे त्यांना २००० साली ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ आणि २००८ साली ‘पद्म विभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल आॅफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आला.
११) आशातार्इंनी त्यांच्या करिअरची सुरुवात गायनातून केली, मात्र त्यांना अभिनयातदेखील आवड होती.
१२) आशातार्इंनी २० वेगवेगळ्या भाषेत २० हजार पेक्षा जास्त गाणी गायिली आहेत. 
१३) आशाताई ह्या चांगल्या आणि उत्तम गायिका असून त्या मिमिक्री कलाकारदेखील आहेत. विशेष म्हणजे त्या लता मंगेशकर आणि गुलाम अली यांच्या आवाजात चांगले गाणे देखील गाऊ शकतात.
१४) आशा भोसले ह्या ‘ग्रॅमी अ‍ॅवार्ड’साठी पात्र ठरलेल्या पहिल्या भारतीय गायिका होत्या.
१५) १९४८ साली आशा भोसले यांनी ‘चुनरियॉ’ या चित्रपटात ‘सावन आया रे...’ हे गाणे कोरस म्हणून गायले होते. त्याचे बोल होते ‘बहना खूश हो के सगन मनाये.....’
१६) आशातार्इंनी ‘आजा आजा मैं हुॅँ प्यार तेरा...’ हे गाणे गाण्यास सुरुवातीला नकार दिला होता. त्यांच्या मते ते हे गाणे चांगले गाऊ शकणार नव्हत्या, मात्र शेवटी जेव्हा त्यांनी हे गाणे गायिले तर आपल्या जादुई आवाजाने सर्वांना बेहोश केले होते.  
१७) आशाताई स्वयंपाक देखील चांगल्या पद्धतीने करू शकतात, त्यांना स्वयंपाक करणे खूपच आवडते.
१८) आशातार्इंची मुलगी वर्षा हिने २०१२ मध्ये आत्महत्या केली. ह्या घटनेनंतर आशाताईंना खूप मोठा धक्का बसला होता.
१९) आशातार्इंनी १९४७ पासून ते १९८९ पर्यंत एकूण १० हजार ३४४ गाणे भारतीय भाषेत, पैकी ७ हजार ५९४ गाणे हिंदी भाषेत गायले आहेत. 
२०) आशा भोसले यांच्या सांगितिक आयुष्यावर अनेक पुस्तके असून त्यापैकी 
आशा भोसले : नक्षत्रांचे देणे (संपादक - वामन देशपांडे, मोरया प्रकाशन)
खय्याम (विश्वास नेरुरकर)
नामांकित (अनघा केसकर)
मंगेशकर - स्वरांचा कल्पवृक्ष (प्रभाकर तांबट)
सुरा मी वंदिले (कृष्णकुमार गावंड) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. 
  

Web Title: Asha Bhosle's debut in the 84th year, know about 20 interesting things !!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.