79 वर्षांच्या आशा पारेख यांनी मॅगझिनसाठी केलं फोटोशूट; पाहून तुम्हीही म्हणाल, झक्कास!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 16:39 IST2022-03-14T16:38:32+5:302022-03-14T16:39:10+5:30

Asha Parekh : ''मला लग्न करायला आवडलं असतं पण पण ते कदाचित माझ्या भाग्यात लिहिलेलंच नव्हतं....'', लग्नाबद्दलही बोलल्या...

Asha Parekh, 79, has featured on the cover of a magazine |  79 वर्षांच्या आशा पारेख यांनी मॅगझिनसाठी केलं फोटोशूट; पाहून तुम्हीही म्हणाल, झक्कास!!

 79 वर्षांच्या आशा पारेख यांनी मॅगझिनसाठी केलं फोटोशूट; पाहून तुम्हीही म्हणाल, झक्कास!!

60 व 70 च्या दशकात आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं लाखो लोकांच्या हृदयावर अधिराज्य करणाऱ्या बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) यांच्यावर आजही चाहते फिदा आहेत. तूर्तास आशा पारेख यांच्या नव्या फोटोशूटची चर्चा आहे. होय, 79 वर्षांच्या आशा पारेख यांनी एका मॅगझिनसाठी फोटोशूट केलं. 
 काळ्या रंगाचा टॉप, गळ्यात मोत्यांचा हार, मोकळे केस आणि थोडासा मेकअप असा आशा यांचा लुक आहे.  आशा पारेख यांची दूरवर पाहणारी नजर कॅमेऱ्यानं अचूक टिपलीय. एकूणच आशा पारेख नेहमीप्रमाणे ‘लाजवाब’ दिसत आहेत.

लग्नाबद्दलही बोलल्या...
‘बाझार इंडिया’च्या कव्हरपेजसाठी आशा पारेख यांनी हे फोटोशूट केलं. सोबत या मॅगझिनला त्यांनी दीर्घमुलाखतही दिली. या मुलाखतीत त्या लग्नाबद्दल बोलल्या. लग्न करायला मला आवडलं असतं. पण ते झालं नाही आणि मला त्याची मुळीच खंत नाही, असं त्या म्हणाल्या.


लग्न कदाचित माझ्या भाग्यात लिहिलेलंच नव्हतं...
लग्न करायला मला आवडलं असतं.  लग्न करणार नाही असं काहीही मी ठरवलं नव्हतं. मला देखील लग्न करुन संसार करायचा होता,मुलांना जन्म द्यायचा होता पण ते कदाचित माझ्या भाग्यात लिहिलेलंच नव्हतं. अर्थात आज मला  मुळीच खंत नाही. मी स्वभावाने मीतभाषी. फारशी स्वत:हून कुणाशी न बोलणारी. त्यामुळे लोकं माझ्याशी बोलताना संकोच करायचे. त्यामुळे बहुधा आपल्या इंडस्ट्रीतही कधी कुणी मला लग्नाची मागणी वगैरे घातली नाही,असं त्या म्हणाल्या.

सध्या आशा पारेख चित्रपटांत दिसत नाहीत. पण अनेकदा रिअ‍ॅलिटी शो मध्ये स्पेशल जज म्हणून त्या  दिसतात. आशा पारेख यांनी साठ-सत्तरीच्या दशकात  अनेक सिनेमांत काम केलं. जब प्यार किसीसे होता है,दिल देके देखो,तिसरी मंझिल, लव्ह इन टोकियो,आये दिन बहार के, कटी पतंग असे त्यांचे अनेक सिनेमे गाजलेत. 

Web Title: Asha Parekh, 79, has featured on the cover of a magazine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.