Pathaan Controversy: तुम्ही मला कसं रोखू शकता? ‘बेशरम रंग’ वादावर आशा पारेख स्पष्टच बोलल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 17:03 IST2023-01-06T17:02:30+5:302023-01-06T17:03:03+5:30
Asha Parekh On Pathaan Controversy: शाहरूख खानचा ‘पठाण’ आणि या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सुरू झालेला वाद थांबण्याची चिन्ह नाहीत. आता या वादावर बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Pathaan Controversy: तुम्ही मला कसं रोखू शकता? ‘बेशरम रंग’ वादावर आशा पारेख स्पष्टच बोलल्या...
Asha Parekh On Pathaan Controversy: शाहरूख खानचा ‘पठाण’ (Pathaan) आणि या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सुरू झालेला वाद थांबण्याची चिन्ह नाहीत. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने घाललेल्या भगव्या रंगाची बिकिनीवरून सध्या वातावरण तापलं आहे. भाजपा आणि हिंदू संघटनांनी दीपिकाच्या भगव्या बिकिनीवर आक्षेप घेत तीव्र विरोध नोंदवला आहे. आता या पार्श्वभूमीवर बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आशा पारेख या माजी सेन्सॉर बोर्डाच्या प्रमुख होत्या. या नात्याने त्यांची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे.
मला का थांबवत आहात...?
‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत आशा पारेख या वादावर बोलल्या. त्या म्हणाल्या, बॉलिवूड इंडस्ट्री सध्या अतिशय कठीण काळातून जात आहे. माझ्या 60 वर्षांच्या करिअरमध्ये मी इतका वाईट काळ पाहिला नाही. अशा परिस्थितीत बॉलिवूडला एका हिटची गरज आहे आणि यामुळे ‘पठाण’ चांगल्या पद्धतीने रिलीज होणं गरजेचं आहे. यशराजसारख्या संस्थेला नुकतेच एकापाठोपाठ एक फटके बसत आहेत. नवीन कोणता फटका त्यांना परवडू शकत नाही. जर ‘पठाण’चं प्रदर्शन सुरळीत करायचे असल्यास त्यांनी हे गाणं काढून टाकावं. पण मी स्पष्टपणे सांगू इच्छिते की, माझा गुंडगिरीला पूर्णपणे विरोध आहे. काही लोक त्यांचं मत संपूर्ण देशावर का लादू इच्छितात? त्यांना हा अधिकार कुणी दिला? तुम्हाला चित्रपट पाहायचा नसेल तर पाहू नका. मला चित्रपट पाहायचा आहे, मी बघेल. तुम्ही मला कसं थांबवू शकता?
एका रंगावरून वाद का?
एका रंगावरून इतका वाद होण्याचं कारण काय? प्रत्येक रंग सुंदर असतो. कुण्या एका समाजाचा एका रंगावर अधिकार कसा असू शकतो? असंही त्या म्हणाल्या.
‘पठाण’ हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरूख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहाम मुख्य भूमिकेत आहेत.