Ashish Vidyarthi : आशिष विद्यार्थीची पहिली पत्नी बुडाली दु:खात, पोस्ट करत म्हणाली, "योग्य व्यक्ती..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 09:15 AM2023-05-26T09:15:44+5:302023-05-26T09:17:21+5:30

अभिनेता आशिष विद्यार्थीने ६० व्या वर्षी दुसरं लग्न करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

ashish vidyarthi second marriage first wife rajoshi vidyarthi shared cryptic post | Ashish Vidyarthi : आशिष विद्यार्थीची पहिली पत्नी बुडाली दु:खात, पोस्ट करत म्हणाली, "योग्य व्यक्ती..."

Ashish Vidyarthi : आशिष विद्यार्थीची पहिली पत्नी बुडाली दु:खात, पोस्ट करत म्हणाली, "योग्य व्यक्ती..."

googlenewsNext

अभिनेता आशिष विद्यार्थीने (Ashish Vidyarthi) ६० व्या वर्षी दुसरं लग्न करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कालच त्यांच्या दुसऱ्या लग्नाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. फोटोही व्हायरल झाले. एकीकडे त्यांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे त्यांची पहिली पत्नी मात्र दु:खात बुडाली आहे. राजोशी विद्यार्थी (Rajoshi Vidyarthi) यांनी इन्स्टाग्रामवर काही स्टोरी पोस्ट करत भावनांना वाट मोकळी करुन दिली. त्या स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत असंच त्यांच्या पोस्टमधून दिसतंय.

राजोशी विद्यार्थी यांचं  इन्स्टाग्रामवर पिलू विद्यार्थी नावाने अकाऊंट आहे. त्यांनी काही क्रिप्टिक पोस्ट शेअर केल्या आहेत. त्या वाईट काळातून जात असल्याचं त्यांच्या पोस्टमधून स्पष्ट होतंय. आशिष विद्यार्थी यांच्या लग्नाची बातमी पसरताच १७ तासांच्या आत राजोशीने दोन स्टोरी पोस्ट केल्या. पोस्टमध्ये म्हटले होते की, "योग्य व्यक्ती तुम्हाला कधीच विचारणार नाही की तुम्ही त्यांच्यासाठी किती महत्वाचे आहात. तुम्हाला त्रास होईल असं ते कधीच काही वागणार नाहीत. लक्षात ठेवा." दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले, "सततचे विचार आणि शंका तुमच्या मनातून त्वरित निघून जाव्या. कन्फ्युजनच्या जागी तुम्हाला खात्री येवो. तुमच्या आयुष्यात शांतता येवो. तुम्ही खंबीर आहात. आता वेळ आली आहे की तुम्ही स्वत:साठी प्रार्थना कराल. तुम्ही तेच डिजर्व्ह करता."

Piloo vidyarthi Post

राजोशी यांना इन्स्टाग्रामवर अनेक लोक प्रश्न विचारत आहेत. तुमचा घटस्फोट कधी झाला?  काय झालं होतं? असेच प्रश्न कमेंट्समध्ये विचारले जात आहेत. राजोशी आणि आशिष विद्यार्थी यांना २३ वर्षांचा मुलगा आहे. त्याचं नाव अर्थ विद्यार्थी आहे.

राजोशी काय करतात?

आशिष विद्यार्थी यांची पहिली पत्नी राजोशी विद्यार्थी या अभिनेत्री, डान्सर, गायिका आणि थिएटर आर्टिस्ट आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री शकुंतला बरवा यांची राजोशी एकुलती एक मुलगी आहे.  राजोशी दिसायला खूपच सुंदर असून लाईमलाईटपासून दूर राहणंच पसंत करतात आणि अगदी साधं जीवन जगतात. 

Web Title: ashish vidyarthi second marriage first wife rajoshi vidyarthi shared cryptic post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.