अश्मित म्हणतो, आय मी यू सिस्टर !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2016 09:54 PM2016-11-01T21:54:13+5:302016-11-01T21:54:13+5:30

अनेक सुपरहिट चित्रपटात नायिका म्हणून दिसलेली अमीषा पटेल बरेच दिवसांपासून मोठ्या पडद्या झकळली नाही. तिचे चाहते तिला मिस करीत ...

Ashmit says, I am U Sister! | अश्मित म्हणतो, आय मी यू सिस्टर !

अश्मित म्हणतो, आय मी यू सिस्टर !

googlenewsNext
ong>अनेक सुपरहिट चित्रपटात नायिका म्हणून दिसलेली अमीषा पटेल बरेच दिवसांपासून मोठ्या पडद्या झकळली नाही. तिचे चाहते तिला मिस करीत असणार यात शंकाच नाही. मात्र तिचा भाऊ देखील तिला चांगलाच मिस करतो. आपली बहीण पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसावी अशी त्याची इच्छा आहे, नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान त्याने आपली ही इच्छा बोलून दाखविली. 

2000 साली राकेश रोशन दिग्दर्शित ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये अमीषाने पदार्पण केले होते. या चित्रपटाने अमीषा व हृतिकला रातोरात स्टारडम मिळाले. यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले. सनी देओल सोबतचा ‘गदर एक प्रेम कथा’ व अक्षय खन्ना व बॉबी देओल यांच्यासोबत ‘हमराज’ हे तिचे चित्रपट हिट ठरले. मात्र सुुरुवातीचे चित्रपट सोडल्यास तिला बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळाले नाही. 2013 साली आलेल्या ‘शॉर्टकट रोमियो’ या चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्याहून गायब झाली. या चित्रपटाल बॉक्स आॅफिसवर यश मिळविता आले नाही. 

मात्र अश्मित पटेल ती पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. अश्मित म्हणाला, ‘मला मोठ्या पडद्यावर माझ्या बहिणीची कमतरता भासते, लवकरच ती पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. तिने ज्या चित्रपटात काम केले त्यात तिने आपला सर्वश्रेष्ठ अभिनय केला आहे, ती चांगली नायिका आहे यात दुमत नाही. ती काही चित्रपटात काम करीत आहे. हे चित्रफट लवकरच प्रदर्शित होतील. मी तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहे. मला तिचा अभिमान वाटतो’. 



40 वर्षीय अमीषा बॉलिवूडपासून दूर असली तरी ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. सोशल मीडियावर ती चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे. अश्मितला चित्रपटात आणण्याचे श्रेय अमीषाला जाते असेही सांगण्यात येते. अमीषाचा कमबॅक कसा असेल हे तर येणारा काळच ठरवेल. 

Web Title: Ashmit says, I am U Sister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.