आशुतोष गोवारीकरांच्या लेकाला पाहिलंय का? लवकरच अडकणार लग्नबंधनात, फोटो व्हायरल

By देवेंद्र जाधव | Updated: February 28, 2025 16:16 IST2025-02-28T16:15:40+5:302025-02-28T16:16:09+5:30

बॉलिवूड आणि मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते आशुतोष गोवारीकर यांचा लेक लग्नबंधनात अडकणार आहे (ashutosh govarikar)

ashutosh govarikar son konark govarikar getting married with niyati kanakia | आशुतोष गोवारीकरांच्या लेकाला पाहिलंय का? लवकरच अडकणार लग्नबंधनात, फोटो व्हायरल

आशुतोष गोवारीकरांच्या लेकाला पाहिलंय का? लवकरच अडकणार लग्नबंधनात, फोटो व्हायरल

बॉलिवूमध्ये 'लगान', 'स्वदेस', 'जोधा अकबर' यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे आशुतोष गोवारीकर (ashutosh govarikar). अलीकडच्या काळात आशुतोष गोवारीकर यांनी मराठी इंडस्ट्रीतही अभिनय केला. 'व्हेंटिलेटर' आणि 'मानवत मर्डर' सारख्या सिनेमा आणि वेबसीरिजमधून आशुतोष गोवारीकर यांनी छाप पाडली. आशुतोष यांच्या घरी सध्या लग्नाची धामधूम सुरु आहे. त्यामागचं कारण म्हणजे आशुतोष गोवारीकर यांचा लेक लग्नबंधनात अडकणार आहे. जाणून घ्या सविस्तर

आशुतोष गोवारीकर यांचा लेक अडकणार लग्नबंधनात

आशुतोष गोवारीकर यांचा लेक कोणार्क गोवारीकर लग्नबंधनात अडकणार आहे. नियती कनकियासोबत कोणार्क लग्न करणार आहे. प्रसिद्ध रिअल इस्टेट टायकून रसेश बाबूभाई कनकिया यांची ही मुलगी आहे. २ मार्च २०२५ रोजी कोणार्क आणि नियती एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकणार आहेत. मुंबईमध्ये मित्रपरिपार, कुटुंबियांच्या उपस्थितीत कोणार्क - नियतीचा लग्नसोहळा पार पडणार आहे. त्यामुळे आशुतोष सध्या लेकाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत.





कोणार्क काम काय करतो?

आशुतोष गोवारीकर काम काय करतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर असंय की, कोणार्क सध्या फिल्ममेकिंगचं शिक्षण घेत आहे. त्यामुळे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन कोणार्क सध्या फिल्ममेकिंगचे धडे गिरवत आहे. कोणार्क आणि नियतीच्या लग्नाला बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. आशुतोषही लेकाच्या लग्नाची जय्यत तयारी करतील यात शंका नाही.
 

 

Web Title: ashutosh govarikar son konark govarikar getting married with niyati kanakia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.