Asia Cup T20: हिच्याचमुळे मॅच हरलो...हिला बॅन करा...; उर्वशी रौतेलावर भडकले युजर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 10:22 AM2022-09-05T10:22:03+5:302022-09-05T10:22:23+5:30

Asia Cup T20, Urvashi Rautela : रिषभ केवळ 14 धावा करून आऊट झाला. साहजिकच यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी रिषभला फैलावर घेत, त्याला ट्रोल केलं. पण तो एकटा नाही तर यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री उर्वशी रौतेला ही देखील ट्रोल झाली.

Asia Cup T20 After Rishabh Pant out Fans Want Urvashi Rautela Banned From The Stadium | Asia Cup T20: हिच्याचमुळे मॅच हरलो...हिला बॅन करा...; उर्वशी रौतेलावर भडकले युजर्स

Asia Cup T20: हिच्याचमुळे मॅच हरलो...हिला बॅन करा...; उर्वशी रौतेलावर भडकले युजर्स

googlenewsNext

दुबईत रविवारी आशिया कप टी-20 च्या लढतीत भारत-पाक सामना रंगला. ही मॅच पाहायला एक अभिनेत्री स्टेडियममध्ये पोहोचली आणि जोरदार चर्चा झाली. आम्ही कोणत्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल. होय,आम्ही बोलतोय ते अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) हिच्याबद्दल. कालचा भारत-पाक सामना नेहमीप्रमाणे चुरसीचा झाला. पण या सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. रिषभ पंत (Rishabh Pant) विराट कोहलीसोबत मिळून मोठी खेळी खेळेल, असा चाहत्यांना विश्वास होता. पण रिषभ केवळ 14 धावा करून आऊट झाला. साहजिकच यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी रिषभला फैलावर घेत, त्याला ट्रोल केलं. पण तो एकटा नाही तर यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री उर्वशी रौतेला ही देखील ट्रोल झाली. उर्वशी रौतेलाला स्टेडियममध्ये बॅन करा, अशी मागणी सोशल मीडियावरच्या क्रिकेटप्रेमींनी लावून धरली.   उर्वशी रिषभ पंतसाठी ‘पनौती’ आहे, असं म्हणत अनेकांनी तिला स्टेडियमवर बॅन करण्याची मागणी केली.

हिच्याचमुळे मॅच हरलो...
स्टेडियममधला उर्वशीचा व्हिडीओ समोर आला आणि युजर्स कमेंट्स करायला लागले. हिला क्रिकेट आवडत नाही तर ही का येते मॅच पाहायला, खोटारडी कुठली, अशी कमेंट एका युजरने केली. इंडियाला चीअर करायला गेली होती की रिषभ पंतला? असा सवाल अन्य एका युजरने केला. फक्त हिच्याचमुळे आपण मॅच हरलो, अशी कमेंटही एका युजरने केली.

पंत भाई के लिए पनौती हो तुम, ये पनौती फिर आ गई मॅच देखने, ये जब भी मॅच देखने जाती है, इंडिया की हार होती है, इसको बुलाता कौन बे, अशा कमेंट अनेक युजर्सनी केल्या.

उर्वशी व रिषभ यांच्यात काही दिवसांपूर्वी शाब्दिक युद्ध रंगलेले पाहायला मिळालं. उर्वशीने एका मुलाखतीत अप्रत्यक्षपणे रिषभवर भाष्य करताना तो मला भेटण्यासाठी 12-14  तास  थांबला होता व त्याने मला 60 मिस्ड कॉल दिल्याचे तिने म्हटलं होतं. त्यावर रिषभनेही सडेतोड उत्तर दिलं होतं.

Web Title: Asia Cup T20 After Rishabh Pant out Fans Want Urvashi Rautela Banned From The Stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.