​सलमानला विचारले, स्वत:चे मुले कधी होतील? उत्तर जाणून व्हाल चकित !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2017 06:27 AM2017-06-20T06:27:49+5:302017-06-20T11:57:49+5:30

बॉलिवूडचे बजरंगी भाईजान सलमान खान सध्या ‘ट्यूबलाइट’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यासाठी तो कधी टीव्ही शो तर कधी प्रेस कॉन्फरन्समध्ये ...

Asked Salman, When will your own children ever be? Will be surprised to know the answer! | ​सलमानला विचारले, स्वत:चे मुले कधी होतील? उत्तर जाणून व्हाल चकित !

​सलमानला विचारले, स्वत:चे मुले कधी होतील? उत्तर जाणून व्हाल चकित !

googlenewsNext
लिवूडचे बजरंगी भाईजान सलमान खान सध्या ‘ट्यूबलाइट’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यासाठी तो कधी टीव्ही शो तर कधी प्रेस कॉन्फरन्समध्ये दिसत आहे. सोबतच या दरम्यान सलमानशी जुडलेले बरेच खुलासेही समोर येत आहेत, ज्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. 

when a child ask question with salman khan - Bollywood News in Hindi

सलमान खानला लहान मुले किती आवडतात हे आपणास माहित आहेच. याच कारणाने सलमान गरीब मुलांना मदत करीत असतो. मात्र एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये सलमानला विचारण्यात आले की, ‘स्वत:चे मुले कधी होतील?’ विचार करा, सलमानचे काय उत्तर असेल. आपणही त्याचे उत्तर ऐकण्यासाठी उत्सुक असालच. चला जाणून घेऊया सलमानने काय उत्तर दिले ते. ही प्रेस कॉन्फरन्स स्पेशल शो ‘सुपरनाइट विद ट्यूबलाइट’ संबंधीत होती. 
ट्यूबलाइटच्या प्रमोशनसाठी सलमान खान लहान भाऊ सोहेल खानसोबत या खास कॉमेडी शोमध्ये सहभागी झाला होता. याशिवाय शोमध्ये सुनील ग्रोवर, संकेत भोसले आणि असगरने आपल्या कलेतून सलमान आणि दर्शकांना हसवून लोटपोट केले.  

when a child ask question with salman khan - Bollywood News in Hindi

यादरम्यान प्रेस कॉन्फरन्सचा एक भाग ठेवण्यात आला होता, ज्यात रिपोर्टर लहान मुले होती. हे सर्व मुले चॅनेला अजून एक शो ‘सबसे बड़ा कलाकार’मध्ये सहभागी होते. या दरम्यानच एका मुलाने सलमानला प्रश्न विचारला की, ‘आपणास मुले एवढी आवडतात, तर तुम्हाला स्वत:चे मुले कधी होणार?’ प्रश्न अगदी सरळ होता. मात्र हा प्रश्न ऐकुन शोमध्ये तर एकच हास्यकल्लोळ माजला. सलमान स्वत: आपले हासणे थांबवू  शकला नाही. मात्र थोडा दचकलादेखील. मात्र, प्रश्न जास्त गभीरतेने न घेता विनोदाने उत्तर दिले की, ‘आतापासून प्रयत्न करायला सुरुवात करतो.’ हे उत्तर ऐकुन शोमध्ये अजूनच हशा पिकला.

Also Read : ​एक्स गर्लफ्रेण्ड रडायची तेव्हा सलमानला हसू आवरणे व्हायचे अशक्य !
                    : सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’मधून कापले १९ मिनिटं! वाचा काय आहे कारण!!

Web Title: Asked Salman, When will your own children ever be? Will be surprised to know the answer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.