बॉलिवूडच्या या सेलिब्रेटींनी लढवली आहे निवडणूक, कुणाचा झाला विजय तर कुणाचा पराजय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 02:24 PM2019-10-21T14:24:45+5:302019-10-21T14:26:21+5:30
बॉलिवूडमधील सेलिब्रेटींनी राजकारणात आपलं नशीब आजमावलं आहे. यात काहींना यश मिळालं तर काहींना अपयश.
आज राज्याच्या विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. हळूहळू नागरिक घरातून बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटींनी मतदान केले आहे. यात किरण राव, रवी किशन, शुभा खोटे, नसीरुद्दीन शाह, आमीर खान व पद्मिनी कोल्हापुरे या सेलिब्रेटींचा समावेश आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रेटींनी राजकारणात आपलं नशीब आजमावलं आहे. यात काहींना यश मिळालं तर काहींना अपयश.
जया प्रदा
समाजवादी पार्टीच्या माजी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आधी त्या समाजवादी पार्टीत होत्या. त्या राजकारणातील जुन्या खेळाडू आहेत.
सिनेइंडस्ट्रीत नाम कमाविल्यानंतर व यशस्वी झाल्यानंतर राजकारणात हेमा मालिनी यांनी प्रवेश केला. त्या २००४ साली भाजप पक्षात सहभागी झाले. त्या दोन वेळा मथुरामधून निवडणूक लढल्या आणि दोन्ही वेळा त्यांचा विजय झाला.
शत्रुघ्न सिन्हा
शत्रुघ्न सिन्हा यांनी खूप आधीच राजकारणात पाऊल टाकलं होतं. जवळपास तीन दशक भाजपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये काँग्रेस पक्षात सहभागी झाले.
स्मृती ईराणी
छोट्या पडद्यावरील संस्कारी सून तुलसीची भूमिका साकारणाऱ्या स्मृती ईराणी आता राजकारणातील जुन्या खेळाडू आहेत. स्मृती यांनी २००३ साली भाजप पक्षात प्रवेश केला. २००४ साली महाराष्ट्र युथ विंगच्या त्या अध्यक्षा झाल्या. २०१९ साली त्या अमेठी मतदारसंघात राहुल गांधी यांच्या विरोधात उभ्या राहिल्या आणि जिंकल्यादेखील.
राज बब्बर
बॉलिवूड चित्रपट 'निकाह', 'वारिस', 'अर्पण', 'घायल' आणि 'प्रेम गीत' यांसारख्या चित्रपटात झळकलेले अभिनेते राज बब्बर बऱ्याच कालावधीपासून राजकारणात सक्रीय आहे.
सनी देओल
सनी देओल त्याचे वडील धर्मेंद्र व हेमा मालिनी यांच्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. लोकसभा निवडणूक २०१९मध्ये सनी देओल भाजप पक्षातून गुरदासपूर मतदार संघातून निवडणूक लढवली आणि चांगल्या मतांनी विजय मिळविला.
उर्मिला मातोंडकर
लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये उर्मिला मातोंडकर काँग्रेस पक्षात सामील झाली. मात्र तिला निवडणुकीत अपयश आले. त्यानंतर आता तिने काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
नुसरत जहाँ
बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये पश्चिम बंगालमधील बसीरहाट मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जास्त मतांनी यश विजय मिळविला.
रवी किशन
भोजपुरी इंडस्ट्रीतील सुपरस्टार रवी किशन २०१४ साली निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले होते. २०१९ साली लोकसभा निवडणुकीत भाजपकडून गोरखपूर मतदार संघातून लढले होते आणि ते तिथून जिंकूनही आले होते.
किरण खेर
वीर जारा, देवदास व रंग दे बसंती यासारख्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री किरण खेर देखील राजकारणात सक्रीय आहेत. त्या भाजपच्या नेत्या असून चंदीगढच्या खासदार आहेत.
विनोद खन्ना बॉलिवूडसोबतच राजकारणात आपले स्थान निर्माण केले होते. विनोद खन्ना भाजपच्या तिकिटावर गुरूदासपुरचे खासदार होते. २०१७ साली विनोद खन्ना यांचे निधन झाले आहे.