​शिवायच्या कमाईतून शहिदांना मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2016 09:52 PM2016-10-22T21:52:44+5:302016-10-22T21:52:44+5:30

‘शिवाय’ ज्या दिवशी सर्वाधिक कमाई करेल त्या दिवशीची संपूर्ण कमाई उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुुटुंबियांना देण्यात येणार ...

Assistance to the martyrs through earning money | ​शिवायच्या कमाईतून शहिदांना मदत

​शिवायच्या कमाईतून शहिदांना मदत

googlenewsNext
ong>‘शिवाय’ ज्या दिवशी सर्वाधिक कमाई करेल त्या दिवशीची संपूर्ण कमाई उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुुटुंबियांना देण्यात येणार असल्याचे अजय देवगने जाहीर केले आहे. या सिनेमाचे प्रमोशनादरम्यान त्याची घोषणा केली. 

अजय म्हणाला, प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ज्या शोची कमाई सर्वात जास्त होईल. त्या शोची जमा झालेली रक्कम उरी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना देण्यात येईल. वितरकानी सर्व शोची माहिती एकत्र करून सर्वाधिक असलेली रक्कम मानधन म्हणून पाठविण्यात यावी अशी विनंती केली आहे.  यापूर्वी अजयने सिनेमा ओनर असोसिएशन आॅफ इंडियाच्या सदस्यांना पत्र पाठवून याबाबतची विनंती केली होती. सैनिकांना मानधन मिळणार असल्याचे जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट पाहावा असेच त्याने सुचविले आहे.  

करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’व शिवाय हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्याने बॉक्स आॅफिसवर दोन्ही चित्रपटात लढत रंगणार असल्याचे दिसते. ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रदर्शनाचा तिढा संपला असून अजने केलेले आवाहन या लढतीत आणखी रंगत आणणार असल्याचे दिसते. दुसरीकडे त्याने ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रदर्शनाचा मार्ग सुकर झाल्यावर राजकारणाचा विषय आल्यावर आम्ही काहीच करू शकत नाही असे सांगितले. 



तो म्हणाला, आम्ही मनोरंजनाच्या दुनियेतील लोकांना राजकारणापासून दूर राहायचे आहे. देशाचा विषय असेल तेव्हा मी देशासोबतच असेल. राजकारण मला जमत नाही. आम्ही समाजाप्रमाणे आहोत. मनोरंजनामध्ये धमार्ची समस्या येत नाही. चित्रपटांमध्ये काम करणारे लोक हिंदू, मुस्लिम, पारसी, इसाई आहेत. आम्ही दिवाळी आणि ईद एकत्र साजरी करतो. भारतात पाकिस्तानी कलाकारांवरील बंदींचा प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला, ‘मी याआधी पाकिस्तानी कलाकारांसोबत काम केले आहे. माझ्या चित्रपटातील सर्वांत चांगले गाणे एका पाकिस्तानी गायकाने गायले आहे. हे मला विसरता येणार नाही’. अजय देवगनच्या ‘कच्चे धागे’ या चित्रपटाचे संगीत नुसरत फतेह अली खान यांनी दिले होते, 

Web Title: Assistance to the martyrs through earning money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.