Athiya Shetty KL Rahul: अथिया शेट्टी आणि केएल राहुल या दिवशी बांधणार लग्नगाठ, दाक्षिणात्य पद्धतीनं घेणार सात फेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 11:02 AM2022-12-13T11:02:16+5:302022-12-13T11:02:53+5:30
Athiya Shetty KL Rahul: भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत.
अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली...! भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. बऱ्याच कालावधीपासून त्यांच्या लग्नांच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांवर त्या दोघांनी मौन बाळगलं होतं. अखेर आता त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.
पिंकविलाच्या रिपोर्ट्सनुसार अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. २१ ते २३ जानेवारी दरम्यान त्यांचे लग्न पार पडणार आहे. माना आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया आणि भारतीय क्रिकेटर जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे. हे वृत्त समजल्यावर त्यांचे चाहते खूप खूश झाले आहेत.
अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाला फारशी गर्दी होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहतील. पिंकविलाला क्रिकेटरच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की, या जोडप्याच्या लग्नाचे आमंत्रण डिसेंबरच्या शेवटच्या दिवसांत दिले जाईल. २१ ते २३ डिसेंबर दरम्यान त्यांचे लग्न होणार आहे. फार कमी वेळ शिल्लक असल्याने तयारी सुरू झाली आहे. मात्र अभिनेत्रीच्या कुटुंबीयांकडून याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, हे लग्न दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार होणार आहे. हळद, मेहंदी, संगीत यासह अन्य विधी होतील. हा सोहळा बँक्वेट हॉलमध्ये नसून सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील आलिशान घरात होणार आहे. नुकतेच जेव्हा पापाराझींनी सुनील शेट्टीला विचारले की लग्न कधी होणार? तर तो उत्तरात म्हणाला - लवकरच होईल.