सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यात Athiya Shetty-KL Rahulचं ग्रॅण्ड वेडिंग, लग्नाची तारीख आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 02:52 PM2023-01-06T14:52:10+5:302023-01-06T15:09:44+5:30

केएल राहुल आणि अथियाचं शाही लग्न सुनील शेट्टीच्या आलिशान बंगल्यात होणार आहे.

Athiya shetty kl rahul can get married after 20 january grand wedding will be held at suniel shetty khandala bungalow | सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यात Athiya Shetty-KL Rahulचं ग्रॅण्ड वेडिंग, लग्नाची तारीख आली समोर

सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यात Athiya Shetty-KL Rahulचं ग्रॅण्ड वेडिंग, लग्नाची तारीख आली समोर

googlenewsNext

Athiya Shetty-KL Rahul Wedding: बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील प्रसिद्ध जोडपे केएल राहुल (KL Rahul) आणि अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांच्या लग्नाचे वृत्त बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. याआधी, दोघेही जानेवारीत लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. तसे, या जोडप्याच्या लग्नाबद्दल काही नवीन अपडेट्स समोर येत आहेत. 20 जानेवारी २०२३ रोजी नंतर दोघेही सात फेर्‍या घेणार असल्याची चर्चा होती. या लग्नाला फक्त कुटुंबीय आणि काही जवळचे लोक येणार असल्याचेही सांगण्यात आले होते. दोघांच्या लग्नाचे सर्व फंक्शन्स सुनील शेट्टीच्या घरी पार पडणार आहेत. 

खंडाळात होऊ शकतं लग्न 
रिपोर्टनुसार, लग्नानंतर केएल राहुल-अथिया शेट्टीचे घर रणबीर-आलियाच्या वांद्रे येथील घरापासून दोन इमारतींच्या अंतरावर असेल. वृत्तानुसार, खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या भव्य बंगल्यावर हा विवाहसोहळा पार पडणार आहे. खंडाळ्यातील डोंगरांमध्ये वसलेला सुनील शेट्टीचा बंगला एखाद्या रिसॉर्टपेक्षा कमी नाही. केएल राहुल आणि अथियाच्या लग्नासाठी हे योग्य ठिकाण आहे.

रिपोर्टनुसार, राहुल-अथियाचे लग्न हे खासगी असणार आहे. क्रिकेट, बॉलिवूड आणि बिझनेस जगातील लोक या, ग्रँड वेडिंगमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, लग्नाला फक्त जवळचे लोक उपस्थित राहणार असल्याने सुनील शेट्टी आणि केएल राहुल यांच्या कुटुंबाने एप्रिलमध्ये एक ग्रँड रिसेप्शन देण्याचं प्लानिंग करतायेत. सूत्रांच्या माहितीनुसार, हे लग्न दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार होणार आहे. हळद, मेहंदी, संगीत यासह अन्य विधी होतील. 
 

Web Title: Athiya shetty kl rahul can get married after 20 january grand wedding will be held at suniel shetty khandala bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.