मुंबईतील वादळानंतर अथिया शेट्टीची पोस्ट, नेटिझन्सनी केएल राहूल - संजीव गोयंका वादाशी जोडला संबंध
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 16:06 IST2024-05-14T15:54:17+5:302024-05-14T16:06:14+5:30
KL राहूल आणि संजीव गोयंका यांच्यातील वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावर अथियाने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे (klrahul, athiya shetty)

मुंबईतील वादळानंतर अथिया शेट्टीची पोस्ट, नेटिझन्सनी केएल राहूल - संजीव गोयंका वादाशी जोडला संबंध
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) संघाचे मालक संजीव गोयंका क्रिकेटर केएल राहुलला फटकारताना दिसले. त्यावेळी राहूल मालका संजीव गोयंका यांच्यावर न भडकता शांतपणे ऐकत होता. या व्हिडीओवर विविध स्तरांतून प्रतिक्रिया आल्या. पण राहूलचं कुटुंब काय बोललं नव्हतं. आता यानंतर राहूलची पत्नी आणि अभिनेत्री अथिया शेट्टीने एक पोस्ट केलीय. या पोस्टचा संबंध राहूल आणि गोयंका वादाशी नेटकरी जोडत आहेत.
अथिया शेट्टीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ज्याची चर्चा होताना दिसतेय. अथिया शेट्टीने लिहिले, 'वादळानंतरची शांतता.' एलएसजीला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला तेव्हा केएल राहुलला त्याचे संघमालक झापताना दिसले. हैद्राबादने त्या सामन्यात 10 गडी राखून सामना जिंकला. यानंतर राहुल आणि गोयंका यांच्यात संभाषण झाल. ज्यामध्ये मालक तावातावाने बोलत होते आणि राहूल शांतपणे ऐकत होता. अथियाने मात्र कोणावरही बोट न ठेवता मुंबई वादळावर पोस्ट केलीय.
दरम्यान काल 13 मेला मुंबईत जोरदार वादळ आले होते. त्यावेळी घाटकोपरला सोसाट्याच्या वाऱ्याने एक होर्डींग्जही कोसळलं. या घटनेत 50 हून अधिक लोक जखमी झाले आणि 8 लोकांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना सरकारतर्फे मदत जाहीर केली