ॲटली-सलमान खानच्या सिनेमातून कमल हसन यांचा पत्ता कट? तोडीस तोड सुपरस्टारची वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 17:15 IST2025-02-01T17:15:18+5:302025-02-01T17:15:41+5:30
सलमान खानच्या अपकमिंग प्रोजेक्ट्समध्ये ॲटलीच्या सिनेमाचा समावेश आहे.

ॲटली-सलमान खानच्या सिनेमातून कमल हसन यांचा पत्ता कट? तोडीस तोड सुपरस्टारची वर्णी
सलमान खान (Salman Khan) आगामी 'सिकंदर' (Sikandar) सिनेमातून बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. २०२४ वर्षात त्याचा एकही सिनेमा आला नाही. मात्र २०२५ ची ईद सलमान खान गाजवणार आहे. याशिवाय त्याच्याकडे ॲटलीचाही सिनेमा आहे. 'सिकंदर' नंतर त्याच्याकडे सिनेमांची रांग आहे. ॲटली (Atlee) आणि सलमान खानच्या कोलॅबोरेशनची तर सगळ्यांनात उत्सुकता आहे.
सलमान खानच्या अपकमिंग प्रोजेक्ट्समध्ये ॲटलीच्या सिनेमाचा समावेश आहे. 'जवान' सिनेमातून ॲटलीने बॉलिवूडमध्ये जोरदार पदार्पण केलं. त्याच्या पहिल्याच सिनेमा बॉलिवूडचा किंग शाहरुख खान होता. त्यामुळे आता ॲटलीचं सलमानसोबत येणं उत्सुकता वाढवणारं आहे. याआधी ॲटलीच्या या सिनेमात अभिनेते कमल हसन असणार अशा चर्चा होत्या. मात्र आता त्यांच्या जागी चक्क रजनीकांत यांची वर्णी लागली आहे. एका सुपरस्टारला दुसऱ्या सुपरस्टारने रिप्लेस केले आहे. सलमान आणि रजनीकांत ॲटलीच्या सिनेमासाठी एकत्र येणार आहेत. दोघांच्या चाहत्यांना ही उत्सुकता वाढवणारीच बाब आहे.
इतकंच नाही तर या सिनेमात रश्मिका मंदानालाच कास्ट करणार असल्याची चर्चा आहे. रश्मिका आधीच सलमानसोबत 'सिकंदर' मध्ये दिसणार आहे. सलमानसोबत आणखी एक सिनेमा करण्याची रश्मिकाला लॉटरीच लागली आहे.
सलमान खानने ॲटलीच्याच 'बेबी जॉन' सिनेमात नुकताच कॅमिओ केला होता. यामध्ये वरुण धवन मुख्य भूमिकेत होता. तेव्हापासूनच ॲटली आणि सलमानच्या सिनेमाची चर्चा सुरु झाली होती. याशिवाय सलमान खान 'टायगर व्हर्सेस पठाण' मध्ये शाहरुख खानसोबत दिसणार आहे. तसंच 'किक २'ही त्याच्या अपकमिंग प्रोजेक्ट्समध्ये आहे.