लता मंगेशकर यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, माहित होते विष कोणी दिले, पण नाही केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 12:10 IST2025-02-07T12:08:41+5:302025-02-07T12:10:04+5:30
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी ६ फेब्रुवारी,२०२२ मध्ये वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदी आज आपल्यात नसल्या, तरी त्यांचा सुंदर आवाज आणि गाणी नेहमीच आपल्यासोबत असतील.

लता मंगेशकर यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, माहित होते विष कोणी दिले, पण नाही केली कारवाई
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी ६ फेब्रुवारी,२०२२ मध्ये वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदी आज आपल्यात नसल्या, तरी त्यांचा सुंदर आवाज आणि गाणी नेहमीच आपल्यासोबत असतील. जरी लताजींनी त्यांच्या कारकिर्दीत खूप यश संपादन केले असले तरी त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप दुःखाचा सामना करावा लागला होता. एकदा लता मंगेशकर यांना अन्नातून विष देऊन जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला होता. लताजी वाचल्या, पण नंतर एक व्यक्ती त्यांच्यासाठी रोज जेवण चाखायची आणि मगच त्यांना दिले जायचे. लतादीदींनी एकदा एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते.
स्लो पॉयझनिंगमुळे त्यांची प्रकृती कशी बिघडली होती हे लतादीदींनी सांगितले होते. लता दीदी आयुष्यभर कुमारी राहिल्या आणि इच्छा असूनही त्या कधीही लग्न करू शकल्या नाहीत. याबाबतही त्यांनी सांगितले होते. लता मंगेशकर ३३ वर्षांच्या होत्या तेव्हाची ही गोष्ट. ही गोष्ट आहे १९६३ सालची. लता मंगेशकर यांनी तो सर्वात भयानक काळ म्हणून वर्णन केले होते. लतादीदींनी सांगितले की, त्यांची प्रकृती इतकी बिकट झाली होती की त्या बेडवरून उठू शकत नव्हत्या आणि स्वत: चालूही शकत नव्हत्या. 'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या की, त्यांना स्लो पॉयझन दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. फॅमिली डॉक्टर आर.पी. कपूर यांनी त्यांच्यावर उपचार केले होते.
विष कोणी दिले हे माहित होते, पण...
लतादीदींच्या म्हणण्यानुसार, उपचारादरम्यान त्या तीन महिने अंथरुणाला खिळल्या होत्या. पण डॉक्टरांच्या उपचारामुळे तसेच त्यांच्या जिद्दीमुळे त्या पुन्हा त्यांच्या पायावर उभ्या राहिल्या आणि गाणेही सुरू केली. लतादीदींनी सांगितले होते की, ज्या व्यक्तीने त्यांना विष दिले होते, त्याबद्दल मला माहिती झाली होती. मात्र त्यांच्यावर कधीही कारवाई झाली नाही आणि इच्छा नसतानाही त्यांनी मौन बाळगले. याचे कारण विचारले असता, लता मंगेशकर यांनी त्या व्यक्तीविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे सांगितले होते.
दररोज ही व्यक्ती चाखायची जेवण
त्याचवेळी लता मंगेशकर यांच्या जवळच्या पद्मा सचदेव यांनी त्यांच्या 'ऐसा कहां से लाऊं' या पुस्तकात गायिकेला स्लो पॉयझन दिल्याची घटना सांगितली होती. त्यानंतर एक व्यक्ती रोज जेवण चाखायचे हेही त्यांनी सांगितले. पुस्तकानुसार, लेखक मजरूह सुल्तानपुरी हे अनेक दिवस लता मंगेशकर यांच्या घरी येत असत. ते जेवण आधी स्वतः चाखायचे आणि नंतर लतादीदींना खाऊ घालायचे. लतादीदींनी सांगितले होते की, जोपर्यंत त्या आजारी होत्या, तोपर्यंत मजरूह सुल्तानपुरी रोज त्यांच्या घरी यायचे आणि त्यांच्यासोबत जेवण करायचे.