स्टार्सच्या निगेटिव भूमिकेला प्रेक्षकांनी नाकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 05:00 PM2019-02-10T17:00:00+5:302019-02-10T17:00:02+5:30
काळानुसार चित्रपटात निगेटिव भूमिकांचे स्वरुप बदलले आहे. तसे पाहिले तर आजच्या बॉलिवूडमध्ये नवाजुद्दीनने जणू व्हिलनच्या भूमिकेची जबाबदारी एकट्याने उठविली आहे. मात्र या अगोदर काही लिड अॅक्टर्सने व्हिलन बनून नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला मात्र प्रेक्षकांनी त्यांना चक्क नाकारले.
-रवींद्र मोरे
बॉलिवूडमध्ये एखाद्या व्हिलनशिवाय कोणत्याही चित्रपटाची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. चित्रपटात निगेटिव भूमिका अगदी थोडी जरी असेल, मात्र चित्रपटास पुढे नेण्यासाठी ही भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. काळानुसार चित्रपटात निगेटिव भूमिकांचे स्वरुप बदलले आहे. तसे पाहिले तर आजच्या बॉलिवूडमध्ये नवाजुद्दीनने जणू व्हिलनच्या भूमिकेची जबाबदारी एकट्याने उठविली आहे. मात्र या अगोदर काही लिड अॅक्टर्सने व्हिलन बनून नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला मात्र प्रेक्षकांनी त्यांना चक्क नाकारले. जाणून घेऊया त्या स्टार्सबाबत...
* अभिषेक बच्चन
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचे चित्रपट करिअर जवळपास संपुष्टात येण्यासारखे आहे. त्याच्या चित्रपटांची सरासरी काढली तर बहुतांश चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळले आहेत. अशातच अभिषेकने चित्रपटात निगेटिव भूमिका करूनही नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र त्याचा हा प्रयोगदेखील अयशस्वी ठरला. अभिषेकला ‘रावण’ चित्रपटात निगेटिव भूमिकेत पाहण्यात आले आहे, मात्र या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी नाकारले आणि चित्रपट फ्लॉप झाला.
* गोविंदा
९० व्या दशकात हिंदी चित्रपटाचा ‘हीरो नंबर वन’ अभिनेता गोविंदा सर्वांच्या मनावर राज्य करत होता. मात्र त्याकाळच्या त्याच्या स्माइलची जादू आता काम करत नाही. गोविंदाला अलिकडे ‘रंगीला राजा’ चित्रपटात पाहण्यात आले होते, मात्र हा चित्रपट कधी आला आणि कधी गेला कोणालाच कळले देखील नाही. गोविंदाला सध्या चित्रपट मिळणेच बंद झाले नाही तर त्याला ‘किल-दिल’ चित्रपटात निगेटिव भूमिकेत पाहण्यात आले होते, मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला.
* बॉबी देओल
बॉलिवूड करिअर संपुष्टात येण्याच्या शेवटच्या टप्प्यावर उभा असलेल्या बॉबी देओलच्या स्टाइलदेखील प्रेक्षकांना आवडत नाहीत. बरेच प्रयत्न करुनही बॉबी आपले चित्रपट हिट करु शकत नाहीय. ‘रेस 3’ मध्ये सलमान खानमुळे त्याला क सातरी रोल मिळाला होता, मात्र त्याचा फायदादेखील बॉबीला मिळू शकला नाही. बॉबीने निगेटिव भूमिका साकारुनही नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र त्यातही अयशस्वी ठरला आहे. 'शाका लाका बूम-बूम' मध्ये बॉबीने निगेटिव भूमिका साकारली होती, मात्र यातिल त्याची भूमिका प्रेक्षकांना आज स्मरणातदेखील नाही.
* सिद्धार्थ मल्होत्रा
या यादीत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे नाव देखील समावेश झाले आहे. आपल्या सात वर्षाच्या चित्रपट करिअरमध्ये सिद्धार्थने बरेच फ्लॉप चित्रपट दिले आहेत. अशातच जेव्हा ‘इत्तेफाक’मध्ये त्याला निगेटिव भूमिकेत पाहण्यात आले तर त्याच्या फ्लॉप लिस्टमध्ये हा चित्रपटदेखील समावेश झाला.
*अनिल कपूर
बॉलिवूडचा ‘झक्कास’ अभिनेता म्हणून ओळखला जाणारा अनिल कपूरदेखील या यादीत आहे. अनिल कपूरचे चित्रपट करिअर यशस्वी ठरले आहे, आणि आजही तो चित्रपटात दिसतो. नव्या काळाच्या ‘वेलकम’ ने त्याच्या करिअरला मोठा दिलासा दिला होता, ज्याकारणाने तो चित्रपटसृष्टीत अजूनही टिकला आहे. वेलकम मधील त्याच्या कॉमेडी निगेटिव भूमिकेची प्रेक्षकांनी खूपच प्रशंसा केली होती, मात्र ‘टशन’ मधल्या त्याच्या निगेटिव भूमिकेला प्रेक्षकांनी चक्क नाकारले.