या कारणामुळे ट्विटरवर ट्रेंड होतोय जुडवा 3 हा हॅशटॅग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 05:09 PM2018-10-02T17:09:35+5:302018-10-02T17:14:01+5:30
जुडवा 2 या चित्रपटात वरुण धवनने प्रेम आणि राजा या दोन्ही भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू त्याच्या नायिकांच्या भूमिकेत दिसल्या होत्या. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता.
जुडवा या चित्रपटात सलमान खानने प्रेम आणि राजा अशा दोन्ही भूमिका खूपच चांगल्या प्रकारे साकारल्या होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांना अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटातील सगळीच गाणी हिट झाली होती. या चित्रपटात सलमान खानसोबत करिश्मा कपूर, रंभा, कादर खान, शक्ती कपूर, रिमा लागू यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. हा चित्रपट 1997 ला प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाची लोकप्रियता पाहाता या चित्रपटाचा सिक्वल गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला होता. या चित्रपटाच्या सिक्वलसाठी प्रेक्षकांना जवळजवळ 20 वर्षं वाट पाहावी लागली होती.
जुडवा 2 या चित्रपटात वरुण धवनने प्रेम आणि राजा या दोन्ही भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू त्याच्या नायिकांच्या भूमिकेत दिसल्या होत्या. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता.
जुडवा हा चित्रपट 29 सप्टेंबरला प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होऊन नुकतेच एक वर्षं झाले असल्याने या चित्रपटाच्या फॅन्सने ट्विटरद्वारे या चित्रपटाचे गुणगान गायले आहे. एवढेच नव्हे तर आता जुडवा 2 नंतर निर्माते साजिद नाडियाडवाला आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी जुडवा 3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणावा अशी मागणी त्यांनी त्यांच्या ट्वीटद्वारे केली आहे. त्यामुळे जुडवा 3 हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंड होताना दिसत आहे.
जुडवा आणि जुडवा 2 या दोन्ही चित्रपटांमध्ये नायकांचा डबल रोल प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. आता जुडवा 3 हा नायिकेच्या डबल रोलवर असावा अशी मागणी काही जण ट्विटद्वारे करत आहेत तर काहींनी जुडवा 3 मध्ये देखील वरुण असावा असे सांगितले आहे तर रणवीर सिंगच्या चाहत्यांना जुडवा 3 मध्ये रणवीर सिंगला पाहाण्याची इच्छा आहे.
आता हे ट्वीट पाहून साजिद नाडियाडवाला आणि डेव्हिड धवन काय प्रतिक्रिया देतात हे पाहाणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.