प्रेक्षक अनुभवणार हॉरर कॉमेडीचा नवा तडका...
By अबोली कुलकर्णी | Published: March 4, 2021 01:27 PM2021-03-04T13:27:19+5:302021-03-11T18:58:47+5:30
दिलवाले, फुकरे, डॉली की डोली अशा कित्येक चित्रपटातून वरूणने प्रेक्षकांना खळखळून हसवलंय. आता कॉमेडीचा तोच तडका पुन्हा घेऊन येतोय. होय, ‘रूही’ या हॉरर कॉमेडी चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
अबोली कुलकर्णी
कॉमेडीची अचूक टायमिंग सांभाळणारा अभिनेता वरूण शर्मा अल्पावधीतच युवा पिढीच्या मनात घर करून बसलाय. दिलवाले, फुकरे, डॉली की डोली अशा कित्येक चित्रपटातून वरूणने प्रेक्षकांना खळखळून हसवलंय. आता कॉमेडीचा तोच तडका पुन्हा घेऊन येतोय. होय, ‘रूही’ या हॉरर कॉमेडी चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यानिमित्ताने त्याच्याशी केलेली ही दिलखुलास चर्चा...
१. रूही चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी सांग.
- या चित्रपटात मजेदार लव्हस्टोरी दाखवण्यात आलेली आहे. जेव्हा एखाद्या मुलाचे चेटकीणीवर प्रेम जडते तेव्हा काय धम्माल उडत असेल हे स्क्रिनवरच पाहणे योग्य ठरेल. पण, हॉरर कॉमेडीचा हा अत्यंत वेगळा तडका प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार यात काही शंकाच नाही.
२. राजकुमार आणि जान्हवी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
- खुपच मस्त होता. कारण राज आणि जान्हवी हे दोघेही खुपच कूल आहेत. पडद्यावर आमची बाँडिंग जशी दिसते तशीच मजा आम्ही आॅफस्क्रीनही करायचो. ऑन सेट ही आम्ही एकमेकांसोबत खुप मस्ती करायचो. हे दिवस लक्षात राहतील.
३. प्रेक्षकांना हसवणं किती कठीण असतं?
- खरंतर खुप कठीण आहे. कारण मी तर असं म्हणेन की, लोक सध्या हसणंच विसरून गेले आहेत. प्रत्येक जण कुठल्या तरी टेन्शनखाली वावरतो. त्यामुळे हसणं ही काळाची गरज झालेली आहे. कॉमेडी सीन तयार करणं ही एका कलाकारावर अवलंबून नसतं. त्यामागे संपूर्ण टीम असते.
४. पुढील पाच वर्षांत तू स्वत:ला कुठे बघू इच्छितोस?
- मी कायम प्रेक्षकांच्या हृदयात राहण्यासाठी काम करणार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर हसू फु लवण्यासाठी मी मेहनत घेत राहणार. आत्तापर्यंत जशा मी विविधांगी भूमिका साकारल्या तशाच भूमिका मला कायम मिळत राहो, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.
५. तू सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह आहेस. काय सांगशील ट्रोलिंगविषयी?
- मला असं वाटतं की, सोशल मीडियावर व्यक्ती स्वतंत्र असतो. प्रत्येकाला आपण आदरयुक्त भावनेने पाहिलं पाहिजे. युजर्सनी देखील आपल्या मर्यादेत राहून कमेंट्स केल्या पाहिजेत.