"बरसात का मौसम था और...", तब्बू-अजय देवगणच्या रोमँटिक सिनेमाचा टिझर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 14:21 IST2024-05-31T14:19:56+5:302024-05-31T14:21:02+5:30
अजय देवगण - तब्बू स्टारर 'औरो में कहा दम था' सिनेमाचा रोमँटिक टिझर बातमीवर क्लिक करुन बघा (Auron Mein Kahan Dum Tha, ajay devgn, tabu)

"बरसात का मौसम था और...", तब्बू-अजय देवगणच्या रोमँटिक सिनेमाचा टिझर रिलीज
'दृश्यम' सिनेमा सर्वांना आठवत असेलच. तब्बू आणि अजय देवगण यांच्या अभिनयाची जुगलबंदी सर्वांना आवडली. 'दृश्यम 2' मध्येही तब्बू - अजय देवगणच्या अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. तब्बू - अजयची जोडी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय जोडी असं म्हणता येईल. आता या जोडीच्या चाहत्यांसाठी खुशखबर अशी की, तब्बू - अजय या जोडीचा 'औरो में कहा दम था' हा रोमँटिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा टिझर नुकताच रिलीज झालाय.
'औरो में कहा दम था' चा टिझर रिलीज
'औरो में कहा दम था' सिनेमाच्या टिझरमध्ये बघायला मिळतंय की, अजय देवगणच्या आसपास होळीचा माहोल दिसतो. सर्वजण रंगात न्हाऊन निघतात. अशातच तब्बूची एन्ट्री होते. तब्बू अजयच्या जवळ जात त्याला कडकडून मिठी मारते. अजय - तब्बू दोघेही प्रेमरंगात बुडालेले दिसतात. दुसरीकडे ट्रेलरमध्ये अजय देवगण कैद्याच्या भूमिकेत दिसतो. पावसात भिजत अजयचा रागीट अंदाज बघायला मिळतो. या रोमँटिक टिझरने अल्पावधीत प्रेक्षकांचं मन जिंकलंय.
'औरो में कहा दम था' कधी होणार रिलीज
'बेबी', 'स्पेशल 26' अशा स्पाय थ्रिलर सिनेमांचं दिग्दर्शन करणारे नीरज पांडे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. यानिमित्ताने नीरज पहिल्यांदाच रोमँटिक सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. 'औरो में कहा दम था' सिनेमात अजय देवगण - तब्बू प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमात आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ५ जुलै २०२४ ला हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.