Avneet Kaur Video on Besharam Rang: अवनीत कौरच्या 'सुपर हॉट' अदांनी नेटकरी घायाळ, 'बेशरम रंग'चं असं व्हर्जन पाहिलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 09:15 PM2023-01-09T21:15:28+5:302023-01-09T21:16:32+5:30

अवघ्या २१ वर्षांच्या अवनीतने बिकीन घालून केलं बोल्ड, बिनधास्त व्हिडीओ शूट

Avneet Kaur super hot bold bikini look s3xy dance on Besharam Rang song of Pathaan Song Shahrukh Khan Deepika Padukone | Avneet Kaur Video on Besharam Rang: अवनीत कौरच्या 'सुपर हॉट' अदांनी नेटकरी घायाळ, 'बेशरम रंग'चं असं व्हर्जन पाहिलंय का?

Avneet Kaur Video on Besharam Rang: अवनीत कौरच्या 'सुपर हॉट' अदांनी नेटकरी घायाळ, 'बेशरम रंग'चं असं व्हर्जन पाहिलंय का?

googlenewsNext

Avneet Kaur Video on Besharam Rang: बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या पठाण चित्रपटा संदर्भातील नवीन पोस्टर आज रिलीज करण्यात आले. या पोस्टरसह पठाण चित्रपटाच्या ट्रेलरची तारीखही जाहीर करण्यात आली. १० जानेवारी म्हणजेच उद्या सकाळी ११ वाजता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला जाणार असल्याचे किंग खानने सांगितले. या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याने रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हे गाणे जितके जास्त पसंत केले जात आहे, तितकेच ते ट्रोलदेखील केले जात आहे. गाण्यातील काही दृश्यांवरून अनेक वाद झाल्याचेही दिसून आले आहे. अनेक संघटनांनी निर्मात्यांवर हिंदूधर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. पण या सर्व वादांमध्ये आता या चित्रपटाचा ट्रेलर उद्या रिलीज होणार आहे. त्याआधी सध्या युवा इंटरनेट स्टार अवनीत कौर हिच्या बेशरम रंग वरील व्हिडीओने चांगलाच धुरळा उडवला आहे.

टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेन्सेशन अवनीत कौर ही युवा पिढीतील स्टार पैकी एक आहे. अतिशय लहान वयात तिने खूप नाव कमावले आहे. याशिवाय अवघ्या २१ व्या वर्षांची असलेली अवनीत कौर कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे. अवनीत कौर तिच्या सिझलिंग फोटोंमुळे आणि व्हिडीओ, रील्समुळे खूप चर्चेत असते. सध्या ती पुन्हा एकदा तिच्या इंस्टाग्रामवरील बेशरम रंग गाण्यावर तयार केलेल्या रील व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या गाण्यावर तयार केलेल्या रीलमध्ये तिने काळ्या रंगाची मोनोकिनी घातली आहे. या व्हिडीओतील तिच्या अदांवर चाहते भलतेच फिदा झाल्याचे दिसत आहेत. पाहा तो व्हिडीओ-

----

दरम्यान, अवनीतची सिझलिंग स्टाइल नेहमीच पाहायला मिळते. ती तरूणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. चाहतेही तिला मोठ्या प्रमाणावर पसंत करतात. अवनीत कौरने २०१० मध्ये डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्समधून तिच्या करिअरची सुरुवात केली. २०१४ साली मर्दानी या चित्रपटातही ती दिसली होती. अभिनेत्री असण्यासोबतच अवनीत कौर ही देशातील सर्वात मोठ्या प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहे. तिच्या इंस्टाग्रामवर ३२.६ मिलियन म्हणजेच सुमारे ३ कोटी २६ लाख फॉलोअर्स आहेत. अवनीत कौर कोट्यधीश आहे. CakeKnowledge.com नुसार, तिची एकूण संपत्ती ११ कोटी रुपये आहे. तसेच ती दर महिन्याला ८ लाखांहून अधिक उत्पन्न कमावते.

 

Web Title: Avneet Kaur super hot bold bikini look s3xy dance on Besharam Rang song of Pathaan Song Shahrukh Khan Deepika Padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.