दमदार यशस्वी चित्रपटांनी प्रेक्षकांना केले चकित !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 12:38 PM2019-03-11T12:38:11+5:302019-03-11T13:30:46+5:30
बॉलिवूडमध्ये यश आहे तर अपयशही आहे. गेल्यावर्षी अशाच काही दमदार यशस्वी चित्रपटांनी सर्वांना चकित केले. गेल्या वर्षी काही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत...
-रवींद्र मोरे
बॉलिवूडमध्ये यश आहे तर अपयशही आहे. गेल्यावर्षी अशाच काही दमदार यशस्वी चित्रपटांनी सर्वांना चकित केले. यावर्षीही बरेच चित्रपट रिलीज झालेत, पैकी ‘बदला’, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’, ‘गली बॉय’, ‘मणिकर्णिका’, ‘टोटल धमाल’, ‘लुका छुपी’, ‘सोनचिरीया’ आदी चित्रपटही यशस्वीतेकडे वाटचाल करताना दिसत आहेत. या चित्रपटांची छाप प्रेक्षकांच्या मनावर कितपट पडेल हे तर आगामी काळच ठरवेल, मात्र गेल्या वर्षी काही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत...
* स्त्री
एका लहानशा गावात टेलरिंगचे काम करणाऱ्या राजकुमारच्या या चित्रपटाकडून विशेष अपेक्षा नव्हत्या. ही कथा राजकुमार रावची एका रहस्यमयी मुलीच्या प्रेमात पडण्याची होती, जी एक भूत होती. या चित्रपटातील राजकुमारच्या रावच्या 'विक्की प्लीज'च्या डायलॉगने तर प्रेक्षकांच्या मनात अशी जागा निर्माण केली की जे कधीही विसरु शकत नाहीत. चित्रपटाचे कथानक आणि त्याला साजेशे असे दृष्य यामुळे या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवरदेखील मोठी कमाई केली.
* परमाणु
सर्व समस्यांना पार करत लढण्याची गौरवमय कथा म्हणजे जॉन अब्राहमचा परमाणू चित्रपट होय. या चित्रपटांवरुन निर्मात्यांमध्ये आपापसात थोडे वाद झाले होते. मात्र कायदाचा प्रश्न, वित्तीय संकट आणि अन्य समस्यांवर नियंत्रण मिळविल्यानंतर जॉनने मोठ्या हिमतीने हा चित्रपट प्रदर्शित केला होता. हा भारताच्या पहिल्या परमाणू विस्फोटच्या बाबतीत एक देशप्रेमी चित्रपट होता. प्रेक्षकांनी या चित्रपटास अगदी डोक्यावर धरत खूपच पसंत केले होते.
* सोनू के टीटू की स्वीटी
कोणीच विचार केला नव्हता की, एक असा चित्रपट ज्यात कोणी दिग्गज स्टार नाही आणि तो चित्रपट १०० कोटीचा टप्पा गाठू शकेल. मात्र या चित्रपटाने हे सिद्ध करु न दाखविले. कार्तिक आर्यन, नुसरत भरूचा आणि सनी निजार स्टारर या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर सुमारे १०८.७१ कोटीचा बिझनेस करुन सर्वांना चकित केले होते. या चित्रपटाने दिग्दर्शन लव रंजनने केले होते.
* वीरे दी वेडिंग
करिना कपूर खान, सोनम कपूर आहूजा, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांचा हा हास्य, उत्साह, आकर्षक लोकेशन आणि ग्लॅमरने परिपूर्ण हा एक यशस्वी चित्रपट ठरला आणि या चित्रपटाने सर्वांच्या मनावर वेगळीच छाप सोडली. या चित्रपटास समिक्षकांचीदेखील प्रशंसा मिळाली. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर सुमारे ८० कोटी कमाई केली होती.
* रेड
या चित्रपटानेही १०० कोटीचा टप्पा गाठत सर्वांना चकित केले होते. उत्तर प्रदेशच्या एका दिग्गज नेत्याच्या घरी आयकर विभागाच्या पडलेल्या रेडवर या चित्रपटाने सर्वांच्या मनावर आगळीवेगळी छाप टाकली आहे. या चित्रपटात अजय देवगन आणि सौरभ शुक्लाने दमदार अभिनय केला आहे.