या दोघांनी माझा सिनेमा पार बर्बाद केला..., आलिया-रणबीरबद्दल अयान मुखर्जीचा शॉकिंग खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 06:07 PM2021-12-19T18:07:32+5:302021-12-19T18:08:31+5:30

Alia Bhatt And Ranbir Kapoor : होय, भर कार्यक्रमात ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक Ayan Mukerji असं काही बोलला की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

Ayan Mukerji Reveals How Alia Bhatt And Ranbir Kapoor Ruined His Film, 'Brahmastra' As A Couple | या दोघांनी माझा सिनेमा पार बर्बाद केला..., आलिया-रणबीरबद्दल अयान मुखर्जीचा शॉकिंग खुलासा

या दोघांनी माझा सिनेमा पार बर्बाद केला..., आलिया-रणबीरबद्दल अयान मुखर्जीचा शॉकिंग खुलासा

googlenewsNext

आलिया भट (Alia Bhatt)  व रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor)  ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) 9 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होतोय. दिल्लीत नुकताच या चित्रपटाचं मोशल पोस्टर रिलीज झालं. यानंतर हैदराबादेतही एक कार्यक्रम झाला आणि या भर कार्यक्रमात ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji) असं काही बोलला की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. होय, झूमने दिलेल्या वृत्तानुसार, रणबीर व आलिया या लव्हबर्ड्सबद्दल अयानने धक्कादायक खुलासा केला. ‘ब्रह्मास्त्र’बद्दज माझा काही वेगळाच प्लान होता पण या दोघांनी (आलिया व रणबीर) माझा अख्खा प्लान बिघडवला, असं अयान म्हणाला.

काय म्हणाला अयान?
‘ब्रह्मास्त्र’बद्दल माझा वेगळाच  प्लान होता. जो आलिया व रणबीरने बर्बाद केला. चित्रपट अजून रिलीज व्हायचा आहे आणि हे कपल खुल्लमखुल्ला सोबत फिरत आहे. यामुळे माझा अख्खा प्लान बिघडला. कुणीही आलिया व रणबीरला कपल म्हणून फिरताना पाहू नये, अशी माझी इच्छा होती. म्हणजे,किमान ‘ब्रह्मास्त्र’च्या रिलीजपूर्वी तरी असं काही व्हावं अशी माझी इच्छा नव्हती.  पण तिकडे ‘ब्रह्मास्त्र’चे शूटींग लांबत गेलं, रिलीज डेट पुढे ढकलावी लागली आणि इकडे रणबीर व आलिया पब्लिकली दिसू लागले.

‘ब्रह्मास्त्र’साठी रणबीर व आलिया एकदम परफेक्ट आहेत, हा आमचा विचर होता. सुरूवातीला सर्वकाही सुरळीत होतं. शूटींग सुरू झालं तेव्हा आलिया व रणबीर चांगले मित्र होतं. यानंतर दोघांचंही नातं मैत्रीपलीकडे गेलं. मग ते दोघं सर्रास एकत्र दिसू लागले. ‘तुम सब मेरी फिल्म को बर्बाद कर रहे हो, प्लीज कहीं मत जाओ,’ असं मी त्यांना म्हणायचो. पण त्यांनी माझं काहीही ऐकलं नाही..., असं अयान म्हणाला. अर्थात हे गमतीगमती. कारण अयान हा रणबीर व आलियाचा जवळचा मित्र आहे आणि सगळं काही त्याच्याच ‘साक्षी’नं घडलं आहे.
  
‘ब्रह्मास्त्र’चित्रपटाबद्दल बोलायचं तर या चित्रपटात असून यात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासोबत अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Web Title: Ayan Mukerji Reveals How Alia Bhatt And Ranbir Kapoor Ruined His Film, 'Brahmastra' As A Couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.