​अयान मुखर्जी सांगतोय, रणबीर कपूरसोबत माझा पुढचा चित्रपट सुपरहिरोवर आधारित नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2017 12:43 PM2017-02-02T12:43:02+5:302017-02-02T18:13:02+5:30

अयान मुखर्जी आणि रणबीर कपूर यांच्या वेक अप सिड या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या चित्रपटानंतर ...

Ayan Mukherjee is telling, 'My next movie with Ranbir Kapoor is not based on superheroes' | ​अयान मुखर्जी सांगतोय, रणबीर कपूरसोबत माझा पुढचा चित्रपट सुपरहिरोवर आधारित नाही

​अयान मुखर्जी सांगतोय, रणबीर कपूरसोबत माझा पुढचा चित्रपट सुपरहिरोवर आधारित नाही

googlenewsNext
ान मुखर्जी आणि रणबीर कपूर यांच्या वेक अप सिड या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या चित्रपटानंतर ये जवानी है दिवानी हा चित्रपट त्या दोघांनी केला. हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि आता या जोडीचा आणखी एक चित्रपट येणार आहे.
रणबीर कपूर सध्या संजय दत्तच्या आयुष्यावर बनवल्या जात असलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण झाल्यानंतर तो अयानसोबत चित्रपट करणार आहे. रणबीर आणि अयान ड्रगन नावाचा चित्रपट करत असून तो चित्रपट सुपरहिरोवर आधारित असल्याचे म्हटले जात होते. तसेच हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट डेडपुलचा रिमेक असून या चित्रपटात रणबीर खूप सारी अॅक्शन करणार असल्याचीदेखील चर्चा होती. या चित्रपटात रणबीरची नायिका आलिया भट्ट असल्याचेदेखील म्हटले जात आहे. आलिया आणि रणबीरची चित्रपटात काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत. पण या चित्रपटाबाबत आता अयाननेच स्पष्टीकरण दिले आहे. हा चित्रपट सुपरहिरोवर आधारित नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. या चित्रपटाविषयी अयान सांगतो, "माझा आणि रणबीरचा पुढचा चित्रपट एक सुपरहिरोवर असणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. पण आमचा चित्रपट हा सुपरहिरोवर नसून या चित्रपटात प्रेक्षकांना एक प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. आजच्या काळातील प्रेमकथा चित्रपटात दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. संजय दत्तच्या आयुष्यावर बनवण्यात आलेल्या चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर ऑगस्टमध्ये आम्ही आमच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहोत." 

Web Title: Ayan Mukherjee is telling, 'My next movie with Ranbir Kapoor is not based on superheroes'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.