​‘ऐ दिल...’ची पुन्हा मुश्किल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2016 07:13 PM2016-11-01T19:13:56+5:302016-11-01T19:13:56+5:30

करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ एका वादातून बाहेर निघाला असतानाच नवा वाद जन्माला आला आहे. या चित्रपटातील ...

'Aye Dil ...' is difficult again | ​‘ऐ दिल...’ची पुन्हा मुश्किल

​‘ऐ दिल...’ची पुन्हा मुश्किल

googlenewsNext
ong>करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ एका वादातून बाहेर निघाला असतानाच नवा वाद जन्माला आला आहे. या चित्रपटातील एका संवादामुळे ख्यातनाम गायक मोहंमद रफी यांचा अपमान झाल्याचा आरोप लावला आहे, तोही खुद्द रफी यांचा मुलगा शाहीद याने.  शाहीद रफी यांनी करण जोहरने माझ्या वडिलांचा अपमान केला असल्याचे मत व्यक्त केले आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 



‘ऐ दिल है मुश्किल’ मध्ये अनुष्का शर्माचा ‘मोहंमद रफी गाते नही रोते थे’ असा डॉयलाग आहे. त्यावर शाहीद रफी यांनी आक्षेप नोंदविला आहे. एका दैनिकाशी बोलताना शाहीद रफी म्हणाले, या डॉयलॉगमुळे चित्रपटाला फायदा किंवा तोटा झाला नाही. मग या डॉयलॉगची आवश्यकता होती का? विशेष म्हणजे हा संवाद लिहिताना तो कुणाबद्दल लिहित आहे याचा विचारही करण्यात आला नाही. आपल्या वडिलांबाबत शाहीद म्हणाले, ‘मोहंमद रफी महान गायक होते. ते माझे वडील आहेत म्हणून मी असे म्हणतोय असे समजू नका, त्यांच्या मृत्यूला ३६ वर्षे झाली आहेत. त्यांची फॅन फॉलोर्इंग आजही एवढी मोठी आहे, जेवढी आजच्या गायकांना देखील मिळत नाही’



आपल्या वडिलांविषयी शाहीद म्हणाले, या इंडस्ट्रीमध्ये त्याच्याविषयी कुणीच अपशब्द काढत नाही. हा त्यांचा अपमान आहे, हा मूर्खपणा आहे, एखादा मूर्खच असा डॉयलॉग लिहू शकतो. माझ्या वडिलांनी शम्मी कपूर, राजेंद्रकुमार, विश्वजीत यांच्यासाठी गाणी गायली आहेत. प्रेमगीतांपासून ते थेट कव्वालीपर्यंत त्यांनी सर्व प्रकारच्या गीतांना आपला आवाज दिला आहे. या चित्रपटात जे काही बोलण्यात आले आहे, ते हास्यास्पद आहे. 

करण जोहरच्या चित्रपटात असा डॉयलॉग असल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. करणला माहिती नाही का तो माझ्या वडिलांचा अपमान करतो आहे. माझ्या वडिलांनी करण जोहरच्या वडिलांच्या चित्रपटासाठी गाणी गायली आहेत. मला वाटते त्याला आपल्या यशाचा गर्व झाला आहे. या डॉयलॉगला सेंसर करण्यासाठी आपण पहलाज निहलानीशी भेटणार असल्याचे शाहीद यांनी सांगितले. मात्र, नव्या वादाला तोंड फुटले आहे हे तेवढेच खरे. 

Web Title: 'Aye Dil ...' is difficult again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.