​ आयशा जुल्का आठवतेयं; पाहा, तिचे लेटेस्ट लूक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2017 06:17 AM2017-07-24T06:17:20+5:302017-07-24T11:47:20+5:30

नव्वदच्या दशकात आयशा जुल्का हिने बॉलिवूडवर ‘राज’ केले. चित्रपटांप्रमाणे आपल्या रिलेशनशिपवरूनही ती कायम वादात राहिली. अजूनही आयशा जुल्काचा चेहरा ...

Ayesha Julka remembers; Look, her latest look !! | ​ आयशा जुल्का आठवतेयं; पाहा, तिचे लेटेस्ट लूक!!

​ आयशा जुल्का आठवतेयं; पाहा, तिचे लेटेस्ट लूक!!

googlenewsNext
्वदच्या दशकात आयशा जुल्का हिने बॉलिवूडवर ‘राज’ केले. चित्रपटांप्रमाणे आपल्या रिलेशनशिपवरूनही ती कायम वादात राहिली. अजूनही आयशा जुल्काचा चेहरा तुमच्यासमोर येत नसेल तर ‘जो जीता वही सिकंदर’मधील अंजली आठवा. या चित्रपटात आमिर खानच्या बालमैत्रिणीची भूमिका आयशाने साकारली होती आणि आमिरवर मनातल्या मनात प्रेम करू लागते.



२८ जुलै १९७२ मध्ये श्रीनगरमध्ये जन्मलेल्या आयशाचे वडील एअरफोर्समध्ये होते. तिच्या वडिलांची कायम बदली व्हायची. आयशा १२ वर्षांची असताना तिचे कुटुंब दिल्लीत शिफ्ट झाले. यानंतर आयशाने दिल्लीतच आपले शालेय आणि पुढील शिक्षण पूर्ण केले. आयशाला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. चित्रपट पाहणे, डान्स तिला मनापासून आवडायचा. ११ वर्षांची असताना ‘कैसे कैसे लोग’ या चित्रपटांत तिने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. यानंतर सुमारे ७ वर्षे ती चित्रपटांपासून दूर राहिली. यापश्चात १९९० मध्ये सलमान खानसोबत ‘कुर्बान’ हा तिचा पहिजा चित्रपट आला. १९९२ मध्ये अक्षय कुमारसोबतच ‘खिलाडी’, आमिर खानसोबतचा ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटाने आयशाच्या करिअरला गती दिली. २००३ मध्ये ‘आंच’मध्ये ती दिसली आणि यानंतर हळूहळू इंडस्ट्रीतून गायब झाली.



११ वर्षाची असताना अभिनयाच्या क्षेत्रात येणाºया आयशाला आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे इंडस्ट्री सोडावी लागली. २००३ मध्येच तिने कंस्ट्रक्शन टायकून समीर वाशीसोबत लग्न केले. आता आयशा स्वत:ही एक यशस्वी बिझनेस वूमन बनली आहे. पतीसोबत कंस्ट्रक्शन, स्पा आणि स्वत:ची क्लोदिंग लाईन असा सगळा व्याप आयशा सांभाळते. आयशा अलीकडे मुंबईत एका इव्हेंटमध्ये दिसली. ब्लॅक रंगाच्या या ड्रेसमध्ये ती अतिशय गोड दिसत होती. तिचे या इव्हेंटमधले फोटो तुम्हीही बघायलाच हवेत.

Web Title: Ayesha Julka remembers; Look, her latest look !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.