आयशा शर्मा झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासारखं.....!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 20:00 IST2019-01-25T20:00:00+5:302019-01-25T20:00:00+5:30
सेलिब्रेटींनी वेगवेगळ्या स्टायलिश अंदाजात हजेरी लावली होती. मात्र यावेळी स्टायलिश लूकमध्ये असूनही आयशा शर्मा मात्र नर्व्हस दिसली. त्याला कारणीभूत ठरला तिचा डिझायनर ड्रेस.

आयशा शर्मा झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासारखं.....!
एखादा इव्हेंट, सोहळ्याला हजेरी लावताना सेलिब्रिटी मंडळी संपूर्ण तयारीत हजेरी लावतात. या प्रसंगी आपण ग्लॅमरस, हँडसम कसे दिसू आणि उपस्थितांच्या नजरांसह कॅमे-याच्या नजरा आपल्याकडे कशा राहतील याची सेलिब्रिटी मंडळी विशेष काळजी घेतात. त्यामुळे महागडे डिझायनर ड्रेसेस किंवा स्टायलिश लूकमध्ये सेलिब्रिटी या कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र कधी कधी याच स्टाईल आणि फॅशनमुळे सेलिब्रिटींवर अवघडल्यासारखी परिस्थिती येते. असंच काहीसं घडलं आहे अभिनेत्री आयशा शर्मासोबत त्याचे झाले असे की, दिग्दर्शक पुनीत मल्होत्राने वाढदिवसानिमित्त एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते.
यावेळी सेलिब्रेटींनी वेगवेगळ्या स्टायलिश अंदाजात हजेरी लावली होती. मात्र यावेळी स्टायलिश लूकमध्ये असूनही आयशा शर्मा मात्र नर्व्हस दिसली. त्याला कारणीभूत ठरला तिचा डिझायनर ड्रेस. या ड्रेसमुळे ती थोडी अनकम्फर्टेबल दिसली. मीडियाला पोज देतानाही आयशा वारंवार सावरताना दिसली. त्यामुळे संपूर्ण इव्हेंटमध्ये आयशा नर्व्हस दिसली. तर दुसरीकडे आयशा सोशल मीडियावर याच ड्रेसमुळे ट्रोलही झाली आहे. तिचा हा ड्रेस पाहून बरेच युजर्स संमिश्र प्रतिक्रीया देत असल्याचे पाहायला मिळत आहे. आयशा बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्माची बहीण आहे. नेहाने 'क्या सुपर कूल है हम'. 'यंगिस्तान' आणि 'यमला पगला दिवाना 2' सारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे.