प्लास्टिक सर्जरीमुळे ट्रोल झाल्याने अभिनेत्री वैतागली, थेट इन्स्टाग्रामच केलं डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 12:36 PM2024-08-23T12:36:36+5:302024-08-23T12:37:18+5:30

सलमान खानची हिरोईन आता कशी दिसते?

Ayesha Takia got trolled brutally for doing cosmetic surgery now deletes instagram | प्लास्टिक सर्जरीमुळे ट्रोल झाल्याने अभिनेत्री वैतागली, थेट इन्स्टाग्रामच केलं डिलीट

प्लास्टिक सर्जरीमुळे ट्रोल झाल्याने अभिनेत्री वैतागली, थेट इन्स्टाग्रामच केलं डिलीट

अभिनेत्री आएशा टाकिया (Ayesha Takia)  एकेकाळी सुपरहिट सिनेमांमध्ये झळकली. सलमान खानसोबत 'वाँटेड' सिनेमातून तिने लक्ष वेधलं. त्याआधी 'दिल मांगे मोर', 'टार्झन द वंडर कार', 'डोर', 'पाठशाला' यासह अनेक सिनेमांमध्ये काम केलं. मात्र लग्नानंतर आएशा सिनेसृष्टीतून गायबच झाली. काही वर्षांपूर्वी प्लास्टिक सर्जरी केल्याने ती चर्चेत आली होती. आता पुन्हा तिने प्लास्टिक सर्जरी केल्याने ती चांगलीच ट्रोल होत आहे.

आएशा टाकियाची प्लास्टिक सर्जरी फसल्याने तिला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. सर्जरीमुळे तिच्या चेहऱ्यावर कमालीचा बदल झालाय. डोळे, ओठ सगळंच मोठं दिसतंय. काही वर्षांपूर्वीही तिने सर्जरी केली होती. आताही तिची सर्जरी फेल झाली असल्याचं नेटकरी म्हणत आहे. तिचा सुजलेला चेहरा पाहून चाहत्यांना तर वाईट वाटतंय. काल आएशाने तिचा साडीतला फोटो शेअर केला. यात तिचा चेहरा खूपच विचित्र दिसत होता. यानंतर तिला बरंच ट्रोल केलं गेलं. ट्रोलिंगला वैतागून अखेर तिने इन्स्टाग्रामच डिलीट केलं आहे.

तिने कांजीवरम साडीत सेल्फी पोस्ट केला होता. यामध्ये तिने लिप जॉब आणि कॉस्मेटिक सर्जरी केल्याचं स्पष्ट दिसलं. यावरुन नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केलं. 'चांगल्या चेहऱ्याची वाट लावली' म्हणत तिच्यावर टीका झाली. आता तिने इन्स्टाग्रामच डिलीट केल्याने ती आणखी चर्चेत आली आहे.

आएशा शेवटची 2011 साली 'मॉड' सिनेमात दिसली. २००९ साली तिने फरहान आजमीशी लग्न केलं. फरहान आजमी हा अबू आजमी यांचा मुलगा आहे. आएशाला एक मुलगाही आहे. काही महिन्यांपूर्वीच ती लेकासोबत एअरपोर्टवर दिसली होती. 

Web Title: Ayesha Takia got trolled brutally for doing cosmetic surgery now deletes instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.