आएशा टाकियाचं इन्स्टाग्रामवर कमबॅक, ट्रोलर्सला वैतागून केलेलं डिलीट; आता दिलं थेट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 14:04 IST2024-08-24T14:03:31+5:302024-08-24T14:04:49+5:30
आधी केलं डिलीट, आता कमबॅक; आएशाचं आता ट्रोलर्सला उत्तर

आएशा टाकियाचं इन्स्टाग्रामवर कमबॅक, ट्रोलर्सला वैतागून केलेलं डिलीट; आता दिलं थेट उत्तर
'वाँटेड' फेम अभिनेत्री आएशा टाकिया (Ayesha Takia) बऱ्याच वर्षांपासून सिनेसृष्टीतून गायब आहे. असं असलं तरी सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते. याचं कारण म्हणजे तिचा बदललेला लूक. काही महिन्यांपूर्वी आएशा तिच्या लूकमुळे खूप ट्रोल झाली होती. आता पुन्हा एकदा ती प्लास्टिक सर्जरीमुळे ट्रोल होत आहे. चांगला चेहरा खराब केला म्हणत तिच्यावर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. ट्रोलिंगला कंटाळून दोन दिवसांपूर्वी आएशाने इन्स्टाग्रामच डिलिट केलं होतं. मात्र आता ती पुन्हा इन्स्टाग्रामवर आली असून तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.
चार दिवसांपूर्वी आएशा टाकियाने निळ्या साडीत एक सेल्फी पोस्ट केला होता. यात तिचा चेहरा अक्षरश: सुजलेला दिसत होता. सुजलेले डोळे, फुगलेले गाल हे पाहून नेटकरी तर हैराण झाले होते. चांगला चेहरा खराब करुन घेतला अशा कमेंट्स तिच्या पोस्टवर आल्या. यानंतर तिने इन्स्टाग्रामच डिलीट केलं होतं. आता पुन्हा ती इन्स्टाग्रामवर आली असून तिने ट्रोलर्सला उत्तर देत एक पोस्ट शेअर केली. यात म्हटलं आहे की, 'तुम्ही पाहिलंत का, मी कसं दुर्लक्ष केलं? किती विचारपूर्वक, गोड आणि संयमित.'
आएशाच्या या पोस्टवर मात्र पॉझिटिव्ह कमेंट्स आल्या. कारण तिने कमेंट्ल सेक्शन मर्यादित केला आहे. तरी आएशाच्या या बदललेल्या लूकवर अनेक चाहते नाराज झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी आएशा आपल्या लेकासह विमानतळावर दिसली होती. तिथेही तिला लूकमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
आएशा शेवटची 2011 साली 'मॉड' सिनेमात दिसली. २००९ साली तिने फरहान आजमीशी लग्न केलं. फरहान आजमी हा अबू आजमी यांचा मुलगा आहे. आएशाला एक मुलगाही आहे. काही महिन्यांपूर्वीच ती लेकासोबत एअरपोर्टवर दिसली होती.