आयुष शर्मा आणि वरीना हुसेनने धरला गरब्यामध्ये ताल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 16:46 IST2018-10-11T16:40:38+5:302018-10-11T16:46:51+5:30
नुकताच प्रदर्शित झालेल्या 'लव्हयात्री' चित्रपटातील अभिनेता आयुष शर्मा आणि अभिनेत्री वरीना हुसेन यांनी नुकतीच जुहू इथल्या दांडीयाला हजेरी लावली.

आयुष शर्मा आणि वरीना हुसेनने धरला गरब्यामध्ये ताल
नुकताच प्रदर्शित झालेल्या 'लव्हयात्री' चित्रपटातील अभिनेता आयुष शर्मा आणि अभिनेत्री वरीना हुसेन यांनी नुकतीच जुहू इथल्या दांडीयाला हजेरी लावली. सध्या सर्वत्र चर्चेत असणाऱ्या या जोडीने चित्रपटातील 'छोगाडा' या नवरात्री गरबा गाण्यावर तसेच दांडिया किंग दीपक कुमार यांच्या दांडिया स्पेशल गाण्यांवर ताल धरीत ते थे उपस्थित लोकांची माने जिंकली.
आयुष्य शर्माने म्हणाला की, "मी साजरा करत असलेला हा पहिलाच नवरात्री उत्सव आहे इथे येऊन आमच्यात जो उत्साह निर्माण झाला आहे तो या पूर्वी आम्ही फक्त सेट वर शूट दरम्यान अनुभवला होता. आणि त्यानंतर आज वास्तविक आयुष्यात आज अनुभवत आहोत."
गुजरातच्या पार्श्वभूमीवर साकारलेला ‘लवयात्री’ एक रोमॅन्टिक चित्रपट आहे. वरीना हुसैन ही सुद्धा अभिनेत्री या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतेय. वरिना गुजरातेत येते आणि येथे तिची भेट आयुषसोबत होते. मग दोघांची मैत्री आणि पुढे प्रेम. पण यासाठी दोघांनीही ब-याच अग्नी दिव्यातून जावे लागते, अशी याची ढोबळ कथा आहे. आयुषयात गरबा टीचरची भूमिका साकारणार आहे. या सिनेमातून वरीना हुसेन अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटाचे नाव सुरुवातीला लव रात्री असे ठेवण्यात आले होते. पण या नावामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने या चित्रपटाचे नाव बदलून लव यात्री असे ठेवण्यात आले आहे.