आयुष्मान खुरानाला होता 'हा' गंभीर आजार, आजही दिसतात लक्षणे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 08:01 PM2022-11-21T20:01:38+5:302022-11-21T20:03:07+5:30
आयुष्मान खुराना अॅक्शन पिक्चरमध्येही दिसणार आहे. एन अॅक्शन हिरो मध्ये तो भुमिका करणार आहे. या रोलविषयी सांगताना त्याने एका कॉन्क्लेव्हमध्ये त्याला झालेल्या आजाराविषयी माहिती दिली.
मल्टिटॅलेंटेड अभिनेता आयुष्मान खुरानाचे चाहते कोण नाहीत. त्याचा अप्रतिम अभिनय, सुरेल आवाज, त्याचे व्यक्तिमत्व, स्क्रीप्ट निवड यामुळे तो कायमच वेगळा ठरतो, उठून दिसतो. नेहमी सामाजिक संदेश देणारे सिनेमे करताना त्याचा अभिनय जबरदस्त असतो. आता आयुष्मान खुराना अॅक्शन पिक्चरमध्येही दिसणार आहे. एन अॅक्शन हिरो मध्ये तो भुमिका करणार आहे. या रोलविषयी सांगताना त्याने एका कॉन्क्लेव्हमध्ये त्याला झालेल्या आजाराविषयी माहिती दिली. काही वर्षांपुर्वी आयुष्मानला आजाराने ग्रासले होते.
आयुष्मान सांगतो, ६ वर्षांपुर्वी मला Vertigo व्हर्टिगो झाला होता. एका पिक्चरच्या शुटिंग दरम्यान मला उंचावरुन उडी मारायला सांगितल्यावर मला चक्कर आली. आज सुद्धा मला कधी कधी व्हर्टिगोचे लक्षणं दिसतात. यावर इलाज करता येतो. यासाठी मेडिसिनसोबतच मेडिटेशनचीही आवश्यकता असते.
व्हर्टिगो तुम्हाला तोल जाण्याचा आभास करुन देतो. यामध्ये तुम्हाला चक्कर येते किंवा आजुबाजुला सगळं फिरतंय असे वाटते. व्हर्टिगोचा अटॅक अचानक येतो जो काही सेकंदांसाठी असतो. काही वेळा व्हर्टिगो दैनंदिन जीवनातही प्रभावी असतो. अशावेळी त्यावर उपचार घेण्याची गरज असते.
व्हर्टिगोवर उपाय कोणते ?
औषधे आणि व्यायाम हाच व्हर्टिगोवर उपाय आहे. एंटीहिस्टामाइन सारख्या गोळ्यांनी हे ठीक होऊ शकते. यासोबत बॅलन्स ट्रेनिंग, योगा आणि एक्सरसाईज मुळे बराच फरक पडतो.