Ayushmann Khurana : विकी डोनर फेम 'आयुष्मान खुराना' ठरला हिंदी सिनेमातील 'गेम चेंजर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 15:43 IST2022-11-29T15:34:37+5:302022-11-29T15:43:30+5:30
गोवा येथे झालेल्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये त्याला खास पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. यावेळी त्याने उपस्थित सर्वांचे आभार मानले

Ayushmann Khurana : विकी डोनर फेम 'आयुष्मान खुराना' ठरला हिंदी सिनेमातील 'गेम चेंजर'
बॉलिवुड अभिनेता आयुष्मान खुरानाने आपल्या अप्रतिम अभिनयाने इंडस्ट्री मध्ये यश मिळवले आहे. त्याच्या स्क्रिप्ट चॉईसचे, अभिनयाचे खुप कौतुक केले जाते. नुकताच आयुष्मानला एक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. गोवा येथे झालेल्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये त्याला खास पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. यावेळी त्याने उपस्थित सर्वांचे आभार मानले.
आयुष्मानला या महोत्सवात 'गेम चेंजर' या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. यावेळी त्याने सांगितले, ' हा पुरस्कार माझ्यासाठी खुप खास आहे. माझ्या या आत्तापर्यंतच्या प्रवासात जे जे होते त्या सर्वांचे आभार मानतो. तो पुढे म्हणाला, 'ज्यांनी मला संधी दिली त्यांचे मी आभार मानतो.'
आयुष्मानने आपल्या एकंदर प्रवासावर बोलताना सांगितले, 'मी या इंडस्ट्रीमध्ये एक दशक पूर्ण केले आहे. मी माझ्या सिनेमांमधून सामाजिक, सांस्कृतिक विषयावर आवाज उठवला आहे आणि यापुढेही असे चित्रपट करत राहीन. आज हा पुरस्कार घेऊन खूप छान वाटत आहे.' शेवटी प्रेक्षकांनी आग्रह केल्यानंतर आयुष्मानने 'पानी दा रंग' च्या दोन ओळी गाऊन दाखवल्या.