Video: मुलगा असावा तर असा! महाशिवरात्रीनिमित्त आयुषमान खुरानाने पूर्ण केली वडिलांची खास इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 01:25 PM2024-03-08T13:25:40+5:302024-03-08T13:34:30+5:30

आयुषमानच्या वडिलांचं काहीच दिवसांपुर्वी निधन झालं. आज महाशिवरात्रीनिमित्त आयुष्मानने वडिलांची इच्छा पूर्ण केलीय.

Ayushmann Khurrana fulfill his father dream on mahashivratri and sing shiv kailas stotra | Video: मुलगा असावा तर असा! महाशिवरात्रीनिमित्त आयुषमान खुरानाने पूर्ण केली वडिलांची खास इच्छा

Video: मुलगा असावा तर असा! महाशिवरात्रीनिमित्त आयुषमान खुरानाने पूर्ण केली वडिलांची खास इच्छा

 आयुषमान खुराना हा मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेता.  आयुषमानने आजवर विविध सिनेमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. काहीच दिवसांपुर्वी  आयुषमानच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे  आयुषमानच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आजही  आयुषमान विविध पोस्टच्या माध्यमातून वडिलांच्या आठवणी जागवत असतो. अशातच  आयुषमानने आज महाशिवरात्रीनिमित्त वडिलांची एक इच्छा पूर्ण केलीय. 

 आयुषमानने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत तो शिवकैलास स्तोत्राचं गायन करत आहे.  आयुषमानच्या वडिलांना त्याच्या आवाजात हे स्तोत्र ऐकण्याची खुप इच्छा होती. त्यामुळे  आयुषमानने स्वतः हे स्तोत्र गाऊन वडिलांची इच्छा पूर्ण केलीय.  व्हिडीओ पोस्ट करुन  आयुषमानने महाशिवरात्री निमित्त त्याच्या कुटुंबाची आठवण जागवली आहे.


 आयुषमान भावनिक पोस्ट करुन लिहीतो, “महाशिवरात्री ही आमच्या घरातील नेहमीच एक खास गोष्ट. पप्पा, आई, अपारशक्ती आणि मी दरवर्षी सेक्टर-6 पंचकुला मंदिरात जायचो. गेल्या वर्षी जेव्हा वडिल आजारपणाशी झुंज देत होते तेव्हा त्यांनी शिवरात्रीच्या वेळी एकट्याने मंदिरात जाण्याचे धैर्य दाखवले. शेवटच्या दिवसांमध्ये, त्यांनी मला प्रदीप शर्माने गायलेलं हे स्तोत्र पाठवण्याची विनंती केली होती. जेव्हा पण पप्पा हे स्तोत्र ऐकायचे ते बोलत असत की, बेटा तुझ्या अवाजात हे खुप सुंदर वाटेल." अशाप्रकारे  आयुषमानने हा व्हिडीओ पोस्ट करुन वडिलांची इच्छा पूर्ण केली.

Web Title: Ayushmann Khurrana fulfill his father dream on mahashivratri and sing shiv kailas stotra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.