विमानात चाहतीने मोबाईलमध्ये दाखवला 'तो' खास मेसेज, आयुष्मान खुराना भारावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 16:21 IST2023-08-18T16:20:32+5:302023-08-18T16:21:28+5:30
आयुष्मान इंदूर वरुन विमानाने मुंबईत येत होता. यावेळी त्याच्या समोरच्या सीटवर बसलेल्या महिलेने हळूच तिच्या मोबाईलमधला एक मेसेज दाखवला.

विमानात चाहतीने मोबाईलमध्ये दाखवला 'तो' खास मेसेज, आयुष्मान खुराना भारावला
अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushman Khurana) सध्या 'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2) मुळे चर्चेत आहे. सगळीकडे फिरत तो प्रमोशन करतोय. या दुसऱ्या भागात त्याची अनन्या पांडेसोबत जोडी जमली आहे. आयुष्मानचा लुक पाहून चाहते सिनेमा पाहण्यासाठी फारच उत्सुक झालेत. आयुष्मानची सिनेमा करायची स्टाईल वेगळी आहे. तसंच तो अतिशय प्रभावशाली अभिनेता आहे. बॉलिवूडला मिळालेलं एक गिफ्टच आहे. अशाच शब्दात एका चाहतीने त्यांचं कौतुक केलं आहे.
आयुष्मान इंदूर वरुन विमानाने मुंबईत येत होता. यावेळी त्याच्या समोरच्या सीटवर बसलेल्या महिलेने हळूच तिच्या मोबाईलमधला एक मेसेज दाखवला. काय आहे तो खास मेसेज? तर महिनेने मोबाईलवर 'भारतीय सिनेमासाठी वरदान ठरल्याबद्दल तुझे आभार' अशा आशयाचा मेसेज टाईप केला होता . तो मेसेज वाचून आयुष्मान भारावला. त्याने महिलेचा फोटो ट्वीट करत लिहिले, 'ड्रीम गर्ल 2 च्या प्रमोशनसाठी अनेक शहरात फिरत थकवणारे शेड्यूल असताना या मुलीने मात्र माझा दिवस खुश केला.'
आयुष्मान खुरानाचा चाहतावर्ग मोठा आहे. तो अभिनेता म्हणून टॅलेंटेड आहेच शिवाय तो उत्तम गायकही आहे. त्याची बातच निराळी आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये तो कमालीचा लोकप्रिय आहे हेच या उदाहरणावरुन दिसतं. 'ड्रीम गर्ल 2' मध्ये आयुष्मानने महिलेच्या रुपात दिसणार आहे. 'ड्रीम गर्ल'चा हा सिक्वल आहे. २५ ऑगस्ट रोजी सिनेमा रिलीज होतोय. यामध्ये अनन्या पांडे, परेश रावल, राजपाल यादव, विजय राज यांच्यासह अनेक कलाकार आहेत.